आयपीएलचा थरार येत्या २२ मार्चपासून   

मुंबई : आयपीएल २०२५ चा थरार येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. २ महिने चालणार्‍या या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना एकापेक्षा एक अटीतटीच्या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. आयपीएल २०२५ मधील पहिला सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. आयपीएल २०२५ पूर्वीच हॉटस्टार आणि जिओ हे लाईव्ह स्ट्रिमिंग अ‍ॅपचे विलीनीकरण झाले. त्यामुळे आता जिओ हॉटस्टार नावाचा अ‍ॅपवर सर्व सामने लाईव्ह पाहायला मिळत आहेत. आयपीएलचे सामनेही जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत. जिओ हॉटस्टारने आता आयपीएल सामने फ्री पाहण्यासाठी नवी योजना आखली आहे. तर टीव्ही चॅनेलवर हे सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील.
 
गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२४ पर्यंत सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग जीओ सिनेमा वर होत होते, जिथे चाहत्यांना सामने विनामूल्य पाहता येत होते. मात्र, यावेळी जीओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार यांचे विलीनीकरण झाले आहे. त्यानंतर आता आयपीएल २०२५ लाईव्ह पाहण्यासाठी चाहत्यांना पैसे मोजावे लागणार आहेत.जीओ हॉटस्टारचा मोबाईल प्लॅन १४९ रुपयांपासून सुरू होतो, जो तीन महिन्यांसाठी असेल. म्हणजेच १४९ रुपयांमध्ये चाहत्यांना संपूर्ण आयपीएलचा आनंद घेता येईल. याशिवाय एक वर्षाचा प्लॅन ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर ३ महिन्यांचा सुपर प्लॅन २९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, चाहत्यांना आयपीएल २०२५ पाहण्यासाठी किमान १४९ रुपये मोजावे लागतील.

Related Articles