बलूच लिबरेशन आर्मीचा प्रमुख बशीर झेबची गोळ्या झाडून हत्या   

इस्लामाबाद : बलुच लिबरेशन आर्मीचा म्होरक्या बशीर झेबची इराकमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी बशीरने आपल्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. आता त्याचा संशय खरा ठरला अन् तो ज्या ठिकाणी लपला होता, त्याच ठिकाणी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
   
२०१८ मध्ये बशीर याच्याकडे बलुच लिबरेशन आर्मीचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. यापूर्वी तो संघटनेच्या कोअर कमिटीचा प्रमुख सदस्य होता. संघटनेचा प्रमुख झाल्यानंतर बशीर याने बलुच महिलांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार केले. या महिला बुरख्याखाली बॉम्बयुक्त जॅकेट घालून हल्ले करतात. बशीरचे सुशिक्षित तरुणांना बशीरने बीएलएमध्ये सामील केले, ज्यामुळे संघटना पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनली. त्याच्या नेतृत्त्वाखाली बीएलएने पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढवले. वेळप्रसंगी चिनी सैनिकांनाही लक्ष्य केले. तालिबानशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते, ज्यामुळे पाकिस्तानचे सैन्य या भागात हतबल झाले आहे. 
 
त्याच्या नेतृत्वाखाली बलुचिस्तानमध्ये बीएलएच्या कारवाया तीव्र झाल्या, संपूर्ण प्रदेशात संघटनेची उपस्थिती आणि प्रभाव वाढला. पाकिस्तानातील बड्या नेत्यांनाही बलुचिस्तानवरील सरकारचे नियंत्रण हळूहळू कमकुवत होत असल्याचे मान्य करावे लागले होते.  दरम्यान, बशीर याने अभियांत्रिकीची पदवी घेतली असून, त्याचे वडील बलुचिस्तानचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. क्वेटापासून १४५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या नुष्की शहरात तो वास्तव्यास होता.

Related Articles