सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी यान अंतराळ स्थानकात दाखल   

विल्यम्स यांनी केले क्रू-१० च्या सदस्यांचे स्वागत 

नवी दिल्ली : अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने प्रक्षेपित केलेल्या क्रू-१० मिशनचे सदस्य अंतराळ स्थानकावर दाखल झाले आहेत. सुनीता विल्यम्स यांनी क्रू-१० च्या सदस्यांना अलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले.  
 
स्पेसएक्सचे अंतराळयान ड्रॅगन २८ तासांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहे. रविवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ९. ४० वाजता डॉक झाले आणि हॅच सकाळी ११:०५ वाजता उघडले.  फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून क्रू १० मिशन ड्रॅगन यान अंतराळात पोहचले आहे. या यानातून अंतराळात गेलेले अंतराळवीर यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भेट घेतली. त्यावेळी सुनीता आणि बुच यांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता. हे दोघेही त्यांच्या इतर अंतराळ सहकार्‍यांना पाहून खुश झाले आणि गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी आनंदाने नृत्य करत जल्लोष केला. 
 
१९ मार्चनंतर पृथ्वीवर परतणार 
 
नासाचे कमांडर अ‍ॅनी मॅक्कलेन, वैमानिक आयर्स, जपानी अंतराळ संशोधन संस्थेतील अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रशियाचे अंतराळवीर कोस्मोनॉट  या चार कू्र १० च्या सदस्यांसह विल्यम्स आणि बुच १९ मार्चनंतर अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना होतील. परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यांचे  अंतराळयान अंटलांटिक महासागरात उतरवले जाऊ शकते.

Related Articles