विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकरांची एकहाती सत्ता   

बेल्हे,(प्रतिनिधी) : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्यशील शेरकर यांच्यासह अन्य उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. दरम्यान विघ्नहर साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या २१ च्या २१ जागा सत्यशील शेरकर यांच्याकडे आल्याने त्यांची एकहाती सत्ता आली आहे.विघ्नहर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्यशील शेरकर यांच्या पॅनेलच्या २१ पैकी सतरा जागा बिनविरोध निवड झाल्या होत्या. चार जागासाठी निवडणूक झाली.
 
शनिवारी विघ्नहर साखर कारखान्याचे मतदान झाले,यात १९६२७ मतदारांपैकी १०६१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.शिरोली बुद्रुक गटातील सत्यशील सोपानशेठ शेरकर(१०४२३ मते), संतोष बबन खैरे (१००२५ मते), सुधीर महादू खोकराळे (१००५७ मते) हे विजयी तर रहेमान आब्बास मोमीन इनामदार (११६मते) हे पराभूत झाले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघात सुरेश भीमाजी गडगे (९९२०मते) हे विजयी झाले तर रहेमान आब्बास मोमीन इनामदार (११६मते), नीलेश नामदेव भुजबळ (२२१ मते) हे पराभूत झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी घोषित केले.
 
जुन्नर गटातून अशोक घोलप,अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी,ओतूर गटातून धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, पंकज वामन,रामदास वेठेकर, पिंपळवंडी गटातून विवेक काकडे, विलास दांगट, प्रकाश जाधव, घोडेगाव गटातून यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून प्रकाश सरोगदे, भटक्या-विमुक्त जाती जमाती मतदार संघातून संजय खेडकर यांची बिनविरोध निवड झाली.

Related Articles