घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार   

गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे : घरगुती वापराच्या सिलेंडरमधून लहान व मोठ्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून वेगवेगळ्या कंपनीचे लहान मोठे व १३५ व्यावसायिक गॅससिलिंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप आणि नोजल असा २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 
मदन माधव बामणे (वय २०, महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर) असे आरोपीचे नाव आहे. त्याठिकाणी आरोपी घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस पाईपच्या सहाय्याने काढून तो लहान मोठ्या व कमर्शियल गॅससिलिंडरमध्ये भरत असताना आढळून आला. त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
युनिट सहाचे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण हे पथकासह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी, महादेव मंदिराजवळ घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस पाईपच्या सहाय्याने काढून तो लहान मोठ्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरमधे भरून काळाबाजार सुरू आहे. अशी माहिती पोलीस अंमलदार शेखर काटे यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांनी पुरवठा अधिकारी इम्रान मलानी आणि त्यांच्या पथकाला बोलावून घेतले. त्यानंतर, लोणीकाळभोर पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. 

Related Articles