E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
संत तुकाराम महाराज ३७६वा सदेह वैकुंठ आगमन सोहळा
आळंदी-देहू
, (वार्ताहर) : श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७६व्या बीज सोहळा राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविक वारकरी यांच्या उपस्थितीत हरिनाम जयघोषात श्रींचे सदेह वैकुंठ गमन प्रसंगावर आधारित हभप बापूसाहेब मोरे महाराज देहूकर यांचे सुश्राव्य हृदयस्पर्शी कीर्तन सेवेने बीज सोहळा नामजयघोषात साजरा झाला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजय महाराज मोरे, योगीराज महाराज गोसावी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शरद सोनवणे, विजय बापू शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे सह राज्यातून आलेले मान्यवर महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, देवस्थानचे विश्वस्त आदी मान्यवर वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यात श्री संत तुकाराम महाराज देवस्थान तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. ते पुढे म्हणाले, या वारकरी संप्रदायाबद्दल माझे मनात आदर आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू देवस्थानने मला त्यासाठी संस्थान ने योग्य समजले. हे माझ्यासाठी फार भाग्याचे आहे. पुरस्कार दिल्याबद्दल मी संस्थानचा मनापासून आभारी आहे. वारकर्यांची देखील सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारातून मिळाली आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे. अशा पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्या पेक्षा दुसरे भाग्य नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भंडारा डोंगर येथील भव्य दिव्य सप्ताहास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सद्दीच्छा भेट देऊन सोहळ्यात संवाद साधला. निघोजे येथे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश पवार यांचे नूतन पंपाचे उद्घाटनास भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी देहू नगरपंचायत यांचे वतीने नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत व सत्कार केला. देहू येथील संदेश वैकुंठगमन स्थान मंदिर येथील नंदुरकीचे वृक्ष प्रांगणात हभप. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे बीज सोहळ्यात हरिनाम गजरात सुश्राव्य कीर्तन झाले. यावर्षी श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ३७५ वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात झाली. यावेळी मंदिर परिसरात लक्षवेधी पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई कार्यात आली होती. यावर्षी सोहळ्यात सुमारे ८ लाखावर भाविकांची उपस्थिती असल्याचे देहूतील भाविक शंकरराव हगवणे यांनी सांगितले. देहू नगरपंचायत, देहू देवस्थान, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य सेवा प्रशासन, सार्वजनिक बस वाहतूक प्रशासन यांनी सुसंवाद ठेवत सोहळ्याचे नियोजन केले. यामुळे नागरी सेवा सुविधा प्रभावी राहिल्याचे माऊली घुंडरे पाटील यांनी सांगितले. यावर्षी बीज सोहळ्यास प्रचंड गर्दी झाल्याने आळंदी देहू रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. मात्र वाहतूक पोलीस प्रशासनाने परिश्रम पूर्वक वाहतूक सुरळीत केली.
देहू नगरीत प्राप्त झालेला पुरस्कार हा माझा फक्त एकट्याचा नाही. माझ्यावर प्रेम करणार्या सर्वांचा आहे. माझ्या कामावर प्रेम करणार्या सर्व वारकर्यांचा, धारकर्यांचा, शेतकर्यांचा, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, ज्येष्ठांचा अशा सर्वांचा आहे. आणि या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजाची सेवा अधिक प्रभावीपणे जोमाने करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली.
- एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री
Related
Articles
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
युक्रेन सैन्यदलाच्या प्रमुखपदी आंद्री हॅटोव्ह
18 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
युक्रेन सैन्यदलाच्या प्रमुखपदी आंद्री हॅटोव्ह
18 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
युक्रेन सैन्यदलाच्या प्रमुखपदी आंद्री हॅटोव्ह
18 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
युक्रेन सैन्यदलाच्या प्रमुखपदी आंद्री हॅटोव्ह
18 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?