E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
सांघिक विजय
Samruddhi Dhayagude
16 Mar 2025
मिडविकेट : कौस्तुभ चाटे
भारतीय क्रिकेट संघाने १२ वर्षानंतर चॅम्पियन्स चषक़ जिंकला. ’एक सांघिक विजय’ असे या विजयाचे वर्णन करता येईल. चॅम्पियन्स चषक स्पर्धा म्हणजे च्या ८ संघांमध्ये रंगणारी स्पर्धा. त्यात केलेली एक चूक देखील महागात पडू शकते. भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्वच सामन्यांमध्ये आपले प्रभुत्व गाजवले आणि विजय मिळवले. २०२३ मध्ये एक दिवसाच्या क्रिकेटमध्ये विश्वचषक, २०२४ मध्ये टी-२० सामन्यांचा विश्वचषक आणि आता २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्यपद आजच्या घडीला भारतीय संघ, निदान क्रिकेटच्या ‘लघु प्रकारात्त’(’शॉर्ट फॉरमॅट’) मध्ये अव्वल आहे हे नक्की. या तीनही स्पर्धांचा विचार करता, आपण फक्त एक सामना हरलो, तोही २०२३ मध्ये एकदिवसाच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना. म्हणजेच गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेट खेळत आहे यावर पुन्हा एकदा शिक्कबोर्तब झाले.
२०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार किंवा नाही, कुठे होणार, कशी होणार यावर बरीच खलबते झाली होती. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. अर्थातच केंद्र सरकारने आम्ही पाकिस्तानमध्ये खेळणार नाही अशी भूमिका घेतली आणि आपले सगळे सामने दुबईमध्ये खेळवण्यात येतील असे ठरले. भारतीय संघ उपांत्य आणि अंतिम फेरीत गेला तरच ते सामने दुबई मध्ये होतील हे देखील नक्की झाले. आणि भारतीय संघाने आपल्या समर्थकांना निराश केले नाही. कराची, लाहोर, रावळपिंडी आणि दुबई अशा ४ शहरात हे सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानमधील स्टेडियम तयार होणार का, तिथे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळणार, दहशतवादाचे सावट असणार का असे अनेक प्रश्न होते. पाकिस्तानातील खेळपटट्ट्या म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे होता तर दुबईमध्ये फिरकी गोलंदाजांनी राज्य केले. स्पर्धेबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या पण स्पर्धा मात्र निकोप झाली.
भारतीय संघाचे गट साखळीमधील सामने तसे एकतर्फीच झाले. आधी बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानला हरवून आपण उपांत्य फेरीत प्रवेश केलाच होता. पाकिस्तानचा संघ आपल्याकडून अगदीच सहज पराभूत झाला. विराटने केलेले शतक दीर्घकाळ लक्षात राहील. त्यानंतर आपला साखळीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होता. त्या सामन्यात आपण ४ मंदगती फिरकी गोलंदाज खेळवले. शेवटच्या मिनिटाला भारतीय संघात आलेल्या ’मिस्टरी स्पिनर’ वरुण चक्रवर्तीने त्या सामन्यात आपल्या फिरकीवर किवी संघाला अक्षरशः लोळवले. हर्षित राणाला बाहेर करून वरुणला संघात घेणे चांगले फायदेशीर ठरले. पुढील सर्वच सामन्यांत भारताने ४ फिरकी गोलंदाज खेळवले. आणि चारही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवणे महत्त्वाचे होते. त्या संघात कमिन्स, हेझलवूड आणि स्टार्कसारखे प्रमुख गोलंदाज नव्हते तरी शेवटी समोर ऑस्ट्रेलिया होती. पण त्या सामन्यात देखील आपण सहज जिंकलो. ऑस्ट्रेलियाच्या २६४ धावांचा पाठलाग करताना परत एकदा विराट, श्रेयस आणि राहुल उभे राहिले.
अंतिम सामन्यात मात्र भारतीय संघाचा कस लागला. या सामन्यात न्यूझीलंडने सुरुवात चांगली केली होती. रचिन रवींद्र गेल्या वर्षभरात एक प्रगल्भ क्रिकेटपटू झाला आहे. त्याने सुकाणू हातात घेतले हाते, पण कुलदीपने एक अप्रतिम चेंडू टाकून त्याला बाद केले. पाठोपाठ विलियम्सन देखील गेला आणि किवी फलंदाज हाराकिरी करतात की काय असे वाटू लागले. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेपासून डॅरिल मिचेल आपल्याविरुद्ध मैदानावर उभा ठाकतोच. या सामन्यात देखील तो न्यूझीलंडचा हुकमी एक्का ठरत होता. पण भारतीय गोलंदाजांनी दुबईच्या त्या खेळपट्टीवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत किवी संघाला जखडून ठेवले. सरतेशेवटी न्यूझीलंडचा संघ २५१ पर्यंत मजल मारू शकला.
विजयासाठी २५२ ही काही मोठी धावसंख्या नव्हती. रोहित आणि शुभमनने सुरुवात देखील चांगली केली. १७ षटकात भारताने १०० धावांचा टप्पा ओलांडला होता. पण ग्लेन फिलिप्सने घेतलेल्या एका अप्रतिम झेलामुळे गिल बाद झाला, पाठोपाठ विराट देखील परतला. काही वेळात रोहितने देखील तंबूचा रस्ता पकडला. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने संयमाने खेळ केला नसता तर आपली परिस्थिती अवघड झाली असती. या दोघांसह के एल राहुल, हार्दिक पंड्या आणि अखेरीस रवींद्र जडेजाने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी अंतिम सामन्यात आपल्या खेळाडूंनी, खास करून फलंदाजांनी खूप चुका केल्या. गिल वगळता इतर सगळेच फलंदाज आततायीपणा करत, बेजबाबदार फटके खेळून बाद झाले. आपल्यासमोर खूप मोठे आव्हान नव्हते आणि आपली सुरुवात चांगली झाली होती, त्यामुळे या बेजबाबदार खेळीचा फटका आपल्याला बसला नाही. पण भविष्यात, खास करून महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजांना याची खबरदारी घ्यावी लागेल.
या स्पर्धेत आपले क्षेत्ररक्षण देखील म्हणावे तितके चांगले झाले नाही. संपूर्ण स्पर्धेत आपण अनेक झेल सोडले. या काही चुका वगळल्या तर आपण या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. अर्थात या चॅम्पियनशिपचे महत्त्व मोठे आहे यात काहीच शंका नाही. २०२५ या वर्षात अजून एक मोठी आयसीसी स्पर्धा होणार आहे, ती म्हणजे जून महिन्यात होणारी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा. भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार नाहीे. त्यामुळे आताचा विजय अधिकच महत्त्वाचा आहे.
न्यूझीलंडच्या संघाने देखील या स्पर्धेत चांगला खेळ केला. त्यांचा रचिन रवींद्र या स्पर्धेत २ शतकांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला तर मॅट हेन्रीने सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज म्हणून पहिले स्थान पटकावले. किवी खेळाडू सुरुवातीपासूनच आपल्या दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. या स्पर्धेत देखील त्यांनी आपल्या उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. ग्लेन फिलिप्सने या स्पर्धेत काही अप्रतिम झेल पकडून रसिकांची मने जिंकली. सध्याच्या घडीचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याचे नाव घेतले जाईल.
इतर संघांचा विचार करता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी स्पर्धेत बरी कामगिरी केली असे म्हणावे लागेल. अफगाणिस्तानच्या संघाने, इंग्लंडला दिलेली मात आणि त्या सामन्यात इब्राहीम झादरानने केलेले तडाखेबंद शतक क्रिकेट रसिकांना प्रचंड आनंद देणारे होते. पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंड साठी मात्र ही स्पर्धा फारशी चांगली ठरली नाही. हे तीनही संघ मोक्याच्या क्षणी वाईट खेळले आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. येणार्या काळात त्यांना आपल्या खेळामध्ये चांगली सुधारणा करावी लागणार आहे.
भारतीय संघाने गेल्या वर्षी जूनमध्ये टी-२० सामन्यांचा विश्वचषक जिंकला होता, आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी. रोहितच्या नेतृत्वाखाली या दोन्ही स्पर्धा जिंकताना भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही स्पर्धांमध्ये आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूने कामगिरी केली. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे हे योगदान खेळाच्या आणि स्पर्धेच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचे ठरते. २०१३ नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे. आता पुढे काही काळ एकदिवसाच्या क्रिकेटच्या स्पर्धा नसतील, त्यामुळे या विजयाची गोडी दीर्घकाळ स्मरणात राहील.
Related
Articles
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025
पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने गिलची मागितली माफी
11 Mar 2025
दानिश कनेरियाचे शाहीद आफ्रिदीवर आरोप
14 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025
पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने गिलची मागितली माफी
11 Mar 2025
दानिश कनेरियाचे शाहीद आफ्रिदीवर आरोप
14 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025
पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने गिलची मागितली माफी
11 Mar 2025
दानिश कनेरियाचे शाहीद आफ्रिदीवर आरोप
14 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025
पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने गिलची मागितली माफी
11 Mar 2025
दानिश कनेरियाचे शाहीद आफ्रिदीवर आरोप
14 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)