दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत   

भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला फटकारले आहे.पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
 
पाकिस्तानातील बलूच प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) क्वेट्टाकडून पेशावरकडे जाणार्‍या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. या एक्सप्रेसमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कोनेरी येथे बोगद्यात स्फोट घडवून बीएलएने रेल्वेचे अपहरण केले होते. रेल्वेच्या अपहरणामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी केला होता. या आरोपाला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
 

Related Articles