दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार   

तीन कलमे वाढवली 

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्याविरोधात पुणे पोलिसांनी आणखी तीन नवीन कलमे लावली आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीडित तरुणीचा रस्ता आडवणे, तरुणीला धमकावून मारहाण करणे आणि तरुणीवर दोन वेळा बळजबरीने अत्याचार करणे, अशा गंभीर कलमांचा समावेश आहे. त्यामुळे आता यापुढे आरोपी दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.  
 
स्वारगेट एसटी बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर आरोपी गाडे याने अत्याचार केला होता. या प्रकरणात गाडेच्या विरोधात  पोलिसांकडून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२), ११५ (२) आणि १२७ (२) ही कलमे लावण्यात आली आहेत. यासह, पोलिसांनी आरोपी गाडे आणि पीडित तरुणीचे घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ॉ
 
बुधवारी (ता.१२) सत्र न्यायालयाने गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. आरोपी दत्ता गाडेला २८ फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली होती. 

Related Articles