मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त   

पुणे : पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १६ लाख ८० हजार रूपयेचा २८ किलो गांजा पकडला आहे. ही कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद सुधाकर कांबळे (वय-४४, रा. किल्ला वेस, करमाळा, जि. सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय-४१, रा. मोहननगर, आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आल्याची नावे आहेत.  
 
मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालताना कांबळे आणि पारखे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. यावरून सापाळा लावून कांबळे आणि पारखे यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात अली. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. 

Related Articles