घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता   

वृत्तवेध 

स्वप्नातील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जास्त किंमत मोजायला तयार राहा. कारण निवासी मालमत्तेच्या किमती वाढण्याचा कल कायम राहू शकतो. महागडी घरे असूनही त्यांच्या विक्रीवर   कोणताही परिणाम होणार नाही.
 
‘रिअल इस्टेट’ कंपन्यांकडून नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया-‘नार्डेको’ रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स अलीकडेच जारी करण्यात आला. या अहवालामध्ये बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीसोबतच रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित भागधारकांमध्येही आर्थिक वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया‘(नार्डेको) रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्समधील वर्तमान आणि भविष्यातील भावना अपेक्षेपेक्षा चांगली आहे; परंतु मागील तिमाहीच्या तुलनेत ती कमकुवत झाली आहे.
 
२०२४ च्या चौथ्या तिमाहीमध्ये वर्तमान भावना स्कोअर ५९ वर आला आहे. तिसर्‍या तिमाहीमध्ये तो ६४ होता. याशिवाय, भविष्यातील भावनांचा स्कोअरही ५९ पर्यंत खाली आला आहे. तो गेल्या तिमाहीमध्ये ६७ होता. अहवालानुसार, या दुरुस्त्या असूनही भावना वर्तमान आणि भविष्यासाठी आशावादी राहते. त्यामुळे क्षेत्राच्या दीर्घकालीन संभाव्यतेवर सतत विश्वास दिसून येतो.
 
‘नाइट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की आशावादी क्षेत्रात राहूनही रिअल इस्टेट भावना निर्देशांक अत्यंत सावध राहतो. जागतिक आर्थिक धोरणातील बदल, विशेषत: अमेरिकेतील टॅरिफ क्षेत्रातील बदलाचा परिणाम या क्षेत्रावर होऊ शकतो.
 

Related Articles