E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजकोटच्या अटलांटिस इमारतीला भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
राजकोट : गुजरातच्या राजकोट येथे एक आगीची घटना घडली. राजकोट येथील अटलांटिस इमारतीला आज सकाळी आग लागली. ही आग सहाव्या मजल्यावर सुरूवातीला लागली आणि आगीचा भडका उडाला. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने इमारतीमधील रहिवासी हे घरामध्येच होते. अटलांटिस इमारत ही राजकोटमधील महागड्या इमारतींपैकी एक आहे. मोठ्या सराफी मालकांची घरे याच इमारतीत आहेत.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्यास सुरूवात केली. मात्र, या आगीच्या घटनेत तब्बल तीन जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, १५० फूट रिंग रोडवर असलेल्या अटलांटिस इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली होती. ही आग बंद फ्लॅटमध्ये सुरूवातीला लागली.
इमारतीमध्ये आग लागल्याचे कळताच रहिवासी घाबरले. यानंतर लिफ्टकडे धाव घेत बरेच जण खाली पोहोचले. त्यानंतर या घटनेची माहिती ही
अग्निशमन विभाग आणि पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. अजूनही काहीजण घरामध्ये अडकल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या इमारतीमध्ये सराफी दुकानाचे मालक तसेच नामवंत डॉक्टरांचे कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. आग नेमकी कशी लागली याचा तपास केला जाईल. ही आग सकाळी साधारणपणे १०.३० च्या आसपास लागल्याचे सांगितले जाते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फ्लॅटमध्ये अडकलेल्यांना सुरक्षित खाली उतरवले. आगीच्या घटनेनंतर सर्वत्र धूर धूर दिसत होता. या आगीच्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Related
Articles
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
08 Mar 2025
पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल
14 Mar 2025
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा