E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅल्युमिनियम आणि स्टीलच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याच्या निर्णयाला प्रमुख व्यापारी भागीदारांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. कापड आणि वॉटर हीटरपासून ते बीफ आणि बॉर्बनपर्यंत अनेक अमेरिकन उत्पादनांवर त्यांनी नवीन आणि कठोर शुल्क लादले आहे. अमेरिकेला स्टील आणि अॅल्युमिनियमचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या कॅनडाने स्टील उत्पादनांवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय उपकरणे, कम्प्युटर आणि सर्व्हर, डिस्प्ले मॉनिटर, क्रीडा उपकरणे आणि कास्ट आयर्न उत्पादने अशा अनेक वस्तूंवर करवाढ केली जाणार आहे.
युरोपियन महासंघाने अमेरिकन गोमांस, पोल्ट्री, बॉर्बन आणि मोटारसायकल, पीनट बटर आणि कमोडिटीवर शुल्क वाढवणार आहे. एकूणच, नवीन शुल्कामुळे कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसणार आहे. जगातील दोन प्रमुख व्यापार भागीदारीच्या अनिश्चिततेत भर पडण्याची शक्यता आहे. कंपन्यांना एकतर तोटा सहन करावा लागेल किंवा कमी नफा होईल अन्यथा जास्त किंमतीच्या स्वरूपात ते खर्च ग्राहकांवर टाकतील अशी शक्यता जास्त आहे.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी, किंमती वाढतील आणि युरोप, अमेरिकेतील नोकर्या धोक्यात येतील असे म्हटले आहे. आम्हाला या निर्णयाचा तीव्र खेद आहे. टॅरिफ म्हणजे कर. ते व्यवसायासाठी वाईट आणि ग्राहकांसाठी चांगले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनडाचे पंतप्रधान ट्रम्प यांना भेटणार?
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींनी, ट्रम्प यांनी कॅनडाच्या सार्वभौमत्वाचा आदर दाखवला व्यापारासाठी सामायिक आणि अधिक व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्यास तयार असतील तर ते भेटण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि सुरक्षा भागीदारीचे नूतनीकरण आणि पुन्हा सुरुवात झाल्यास दोन्ही देशांमधील कामगारांची स्थिती सुधारेल आणि हे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
Related
Articles
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा