E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
१४ विकासकांनी थकवले म्हाडाचे ३०० कोटी
विजय चव्हाण
मुंबई
: मुंबईत खासगी विकासकांकडून मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरू असून इमारती बांधण्याचा सपाटाच लावला आहे. मात्र, संक्रमण शिबिरात पाठविलेल्या भाडेकरूंच्या भाड्याची रक्कम न भरल्याने २९२ कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. १५ दिवसांत रक्कम न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे विधान परिषदेत मंगळवारी घोषित करण्यात आले.
खासगी विकसकाकडून पुनर्विकास करताना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात या रहिवाशांना भाड्याने जागा दिली जाते. मुंबईतील १४ खासगी विकासकांंनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील शेकडो गाळे भाडेतत्त्वार घेतले असून गेल्या ८ वर्षां सुमारे २९२ कोटी ३८ लाखांची थकबाकी ठेवली आहे. या विकासकांनी १५ दिवसांच्या आत पैसे भरले नाहीत तर त्यांनी भाड्याने घेतलेले गाळे सील केले जातील, असा इशारा राज्य सरकारच्यावतीने गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला.
मुंबईत जागांचे भाव गगनाला भिडले असून बांधकाम व्यवसाय हा कमी कालावधीत कोट्यवधीचा नफा देणारा व्यवसाय झाला आहे. जुन्या चाळी, झोपडपट्ट्या, इमारती यांच्या पुनर्विकासाचा वेग वाढला आहे. मात्र, पुनर्विकास करताना विकासकांकडून रहिवाशांसाठी म्हाडाची संक्रमण शिबिरे भाड्याने घेतली जातात. परंतु या गाळ्यांचे भाडे विकासक वर्षानुवर्षे भरत नसल्यामुळे त्यांची थकबाकी कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे. यावर विधान परिषदेत काल भाजप सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न विचारला. त्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री भोयर यांनी उत्तर दिले.
बांधकाम थांबवण्याची नोटीस
म्हाडाने १ एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२५ पर्यंत या आठ वर्षांत २७४ कोटी ३८ लाखांची वसुली केली. मात्र, असे असूनही जानेवारी २०२५ पर्यंत थकबाकीची रक्कम १७२ कोटी ५४ लाख आणि त्यावरील विलंब दंड ११९ कोटी ८४ लाख असे मिळून २९२ कोटी ३८ लाख थकबाकी शिल्लक आहे. थकबाकी ठेवणार्या १४ पैकी ६ विकासकांवर कारवाई करत त्यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर १२ विकासकांना थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत इतर परवानग्या देऊ नये, असे निर्देश म्हाडा आणि एसआरएच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आले असल्याची माहिती भोयर यांनी दिली.
पोलिस ठाण्यात तक्रार
आतापर्यंत २२ विकासकांपैकी ६ विकासकांवर वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर म्हाडा अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार विकासकांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तांबाबत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हाधिकार्यांना माहिती देण्याच्या सूचना करण्यात आली आहे.
ठाण्यातील ’हायलँड स्प्रिंग’ची चौकशी होणार
ठाण्याच्या विकासकाने म्हाडाबरोबर मिळून २० टक्क्यांनी परवडणारी घरे उपलब्ध करून दिली. मात्र, सुरुवातीला हायलँड स्प्रिंग असे प्रकल्पाचे नाव जाहीर करून नंतर प्रकल्पाचे नाव बदलून हायलँड पर्ल करण्यात आले. प्रकल्पाला ओसी आणि लॉटरी विजेत्यांकडून एक टक्क्याची रक्कमही हायलँड स्प्रिंगच्या नावाने आहे. विकासकाने अधिकचा फायदा मिळवण्यासाठी हे केले आहे.
Related
Articles
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
एचएसआरपी नंबरप्लेटच्या नावाने लूट थांबवा
10 Mar 2025
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
07 Mar 2025
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
एचएसआरपी नंबरप्लेटच्या नावाने लूट थांबवा
10 Mar 2025
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
07 Mar 2025
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
एचएसआरपी नंबरप्लेटच्या नावाने लूट थांबवा
10 Mar 2025
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
07 Mar 2025
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
एचएसआरपी नंबरप्लेटच्या नावाने लूट थांबवा
10 Mar 2025
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
07 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
5
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
6
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ