मेग लेनिंगचे शतक हुकले   

लखनऊ : महिला प्रिमियर लीगमध्ये खेळवण्यात आलेल्या शुक्रवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात जायंटस आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरातच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने २० षटकांत १७७ धावा केल्या. यावेळी ५ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. सलामीवीर मेग लेनिंग हिने ९२ धावा केल्या. अवघ्या ८ धावांनी तिचे शतक हुकले. शफाली वर्मा हिने ४० धावा केल्या. जेसी जॉन्सन हिने ९ धावा केल्या. त्यानंतर डॉटिन हिने तिचा त्रिफळा उडविला. जेमीमा रॉड्रीक्स हिने ४ धावा केल्या. अनाबेल सुदरलँड हिने १४ धावा केल्या. मार्झिन कॅप हिने नाबाद ७ धावा केल्या. सहारा ब्रायस ही ६ धावांवर नाबाद राहिली. ५ अवांतर धावा तिला मिळाल्या. 

Related Articles