E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
13 Feb 2025
एकदा शाळेत मास्तर राजूचा पेपर तपासताना बेशुद्ध पडले.
कारण, त्याने उत्तरेच तशी लिहिली होती.
प्रश्न १. कोणत्या युद्धात टिपू सुलतान
मारला गेला ?
उत्तर - त्याच्या शेवटच्या युद्धात.
प्रश्न २. भारत स्वातंत्र्याच्या करारावरती
सह्या कोठे झाल्या ?
उत्तर - लिहून झाल्यावर शेवटी.
प्रश्न ३. घटस्फोट का घेतला जातो ?
उत्तर - लग्न झालेले असते म्हणून.
प्रश्न ४. गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते ?
उत्तर - जेथे पातळ लोकवस्ती आहे तेथून.
प्रश्न ५. महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला ?
उत्तर - त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी.
प्रश्न ६. आठ आंबे सहा लोकांना बरोबर कसे वाटणार ?
उत्तर - आमरस करून.
प्रश्न ७. भारतात जास्त बर्फ कोठे पडतो ?
उत्तर - दारूच्या ग्लासमध्ये.
प्रश्न ९. रावण हा कोण होता ?
उत्तर - शाहरुख खान.
प्रश्न १०. मायकल जॅक्सन कोण होता?
उत्तर - माणूस.
---------
पैसा नाही कमावला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...
टप्पा १ : १९५० ते १९७५
या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक... मोठे वाडे... दांडगा रुबाब... निसर्गावर चालणारी शेती... अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले.
तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळवायचे. अनेक पदवीधर पीएसआय, डीवाय.एसपी., तहसीलदार त्या काळात झाले. नाही जरी नोकरी लागली तर आहे की २०-३० एकर शेती. उत्तम शेती, दुय्यम नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती. हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.
टप्पा २ : १९७५ ते १९९५
देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली. शेतीची विभागणी सुरू झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले. बाहेरील राज्यांतील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरू झाले. शेती आता भांडवलदाराची होऊ लागली. विहिरी, मोटारी, पाइप लाइन आल्या. पाणी उपसण्याची स्पर्धा सुरू झाली.
राजकारण गावागावात घुसलं. पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमिनी कवडी मोलाने विकल्या. बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले. स्पर्धा वाढली. आता नोकरी सोपी राहिली नाही. हायस्कूलवर नोकरीचा दर २० लाख झाला. वाढणार्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली. २० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.
टप्पा ३ : १९९५ - २००९
हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ. परराज्यातून मोठ्या प्रमाणात लोक आले. मोठे उद्योग यांनी काबीज केले. हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली. सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकाने चाणाक्ष पुढार्यांची झाली.
मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कूल वर चिटकवणे यातच गुंतलेला दिसला. २० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते. अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.
टप्पा ४ : २००९ ते २०२०
ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले. पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या. मग काय...? जमिनी विकायची स्पर्धाच सुरू झाली. राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा ’मुळशी पॅटर्न’ झाला. जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकर्या करू लागली. आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही. खरी, बिकट गरिबी सुरू झाली. पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरू झाला. बापाकडे लग्नाला पैसा नाही. मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या. गावचा जमीनदार हमाली करू लागला. व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अशा नोकर्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.
टप्पा ५ : २०२० ते २०३०
इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल. ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार. नोकरी हा विषय संपला आहे. नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल. उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल. पैसा न कामविणार्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही. शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल. अजून वेळ गेली नाही. शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा. नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.
जो चूक करतो तो माणूस, तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस, जो दुसर्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस. अजून वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पाहण्यासाठी.
आपल्या माणसाला साथ द्या, आपल्या माणसाला मोठे करा. आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा. आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.
---------
Related
Articles
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
धारावी फेरविकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
08 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
धारावी फेरविकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
08 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
धारावी फेरविकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
08 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
धारावी फेरविकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
08 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
नारायणगाव बस स्थानकाची सरपंचांकडून अचानक पाहणी
10 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
अमेरिकेचा अडसर (अग्रलेख)
5
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
6
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस