पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डीएलएड परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ हजार २८५ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २२९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सर्व माध्यमांतील एकूण २ हजार ४६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संंबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार असून, उत्तरपत्रिकेची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येईल, असे ओक यांनी कळवले आहे.
Fans
Followers