जो रुटचा खास विक्रम   

कटक : कटकमध्ये भारत आणि इंग्लंड आमनेसामने असून दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने शानदार गोलंदाजी करताना पाहुण्या संघाला ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावांवर रोखले. दरम्यान या सामन्यात इंग्लंडसाठी जो रुटने सर्वाधिक धावा करत एक नवा विक्रम केला आहे.
 
इंग्लंडच्या डावातील ११व्या षटकांत संघाची ८१ धावसंख्या असताना फिलिप सॉल्ट २६ धावा करुन दुसर्‍या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. यानंतर, जो रूटने हॅरी ब्रूकसह संघाची सूत्रे हाती घेतली आणि इंग्लंडचा धावसंख्या २७ षटकांत १५० धावांपर्यंत पोहोचवली. इंग्लंडला तिसरा मोठा धक्का ३०व्या षटकात हॅरी ब्रूकच्या रूपात हर्षित राणाने दिला. ब्रुकला फक्त ३१ धावा करता आल्या. ब्रूक बाद झाल्यानंतर, रूट आणि कर्णधार जोस बटलर क्रीजवर राहिले आणि इंग्लंडला ३५ षटकांत २०० धावांचा पल्ला गाठून दिला. यानंतर काही वेळातच, जो रूट आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला.
 
रूटने एकदिवसीय सामन्यात त्याचे ४०वे अर्धशतक झळकावण्याचा महान पराक्रम केला. यासह, या धडाकेबाज फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी एक मोठा पराक्रम केला आहे. खरे तर, जो रूटने भारताविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून इंग्लंडसाठी सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला.

Related Articles