जीबीएस आजाराचा वाढता धोका.!   

सध्या गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस या न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर प्रकारच्या व्हायरल आजाराने मुंबई-पुण्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९६१ मध्ये विदेशात अशी लक्षणे आढळून आलेला आजार म्हणूनच पुन्हा एकदा इथपर्यंत येऊन पोहोचला आहे असे वाटते. पुण्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांकडून ह्या आजाराचे संक्रमण झाले असावे असे वाटते. सर्दी, खोकला, पडसे, हातपाय दुखू लागणे अशी लक्षणे सुरुवातीस दिसताच रक्त तपासणी करण्यात दिरंगाई न करता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार करण्याची गरज असते. स्थानिक आरोग्य विभागाने यासाठी लोकांच्या मोफत आरोग्य तपासण्या अनिवार्य करून या आवश्यक ते उपचार पुरविण्याची व्यवस्था करणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या बाबतीत आजाराचे निदान ठरविण्यात झालेल्या दिरंगाईमुळे त्याचा प्रसार वाढत गेला होता. जीबीएस या जुनाट आजाराचे निदान त्या मानाने कमी काळात झाले असल्याने योग्य त्या औषधोपचाराने व काळजीने आजार आणि त्याचा प्रसार यावर व्यवस्थितपणे मर्यादा घालणे आवश्यक व शक्य आहे असे वाटते. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच स्वच्छ्ता, आरोग्य केंद्रे, प्रवासी वाहने, कार्यालये येथे लोकांनी आपापली काळजी कशी घ्यावी यासंबंधी आरोग्य विभागाने लोकांमध्ये जागृती मोहीम राबविण्याची गरज आहे तशा प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत. पुणे शहरी भाग, पिंपरी, चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील सरकारी विभागांनी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांवर देखरेखीसाठी सहाय्यक वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांच्यामार्फत आजाराचे प्रमाण आणि रुग्णांची सेवा यांवर लक्ष ठेवून आजाराचे नियंत्रण करण्यासाठी पावले उचलली आहेत. तरीहि लोकांनी जागृती राखत सरकारी यंत्रणांना व त्यांच्या सूचनांनुसार सहकार्य करून आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करावी.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.

Related Articles