शाहबाज शरीफ आणि मुलाची निर्दोष मुक्तता   

साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरण

लाहोर : पाकिस्तानच्या एका न्यायालयाने गुरुवारी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा शाहबाज यांना आठ वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या खटल्यातून दोषमुक्त केले.  लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश सरदार महम्मद इक्बाल यांनी सोमवारी निकाल राखून ठेवला होता. लाहोरच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने काल पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा व पंजाबचे माजी मुख्यमंत्री हमजा शहबाज यांना रमझान साखर मिल भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तक्रारदार झुल्फिकार अली यांनी शरीफ यांच्याविरोधात आपण अशी कोणतीही तक्रार केली नव्हती. हा अर्ज कोणी केला आणि कशाच्या आधारे केला, हेही आपणास माहिती नव्हते असे सांगितले.

Related Articles