E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाहतूक नियोजनासाठी मेट्रो आवश्यक
Wrutuja pandharpure
07 Feb 2025
खराडी-विमानतळ, कात्रज-हिंजवडी मेट्रो मार्गाचे पर्याय
पुणे
: खराडी ते विमानतळ, कात्रज ते हिंजवडी हे नवीन मेट्रो मार्गाचे पर्याय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुचवले आहेत. पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासाठी मेट्रो आवश्यक आहे. यासाठी काही नवीन मार्ग सुचवण्यात आले आहेत. या संदर्भातील महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर यांच्याशी चर्चा झाली असून, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना या संदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मंजूर मेट्रो मार्गात समाविष्ट करुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ-खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा. खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि निवासाच्या दृष्टीने विकसीत होत आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणार्यांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खराडी येथे आणि तेथून थेट विमानतळावर जाता येईल. शिवाय खडवासला-स्वारगेट-हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे खराडी हब होणे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे.
पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून यात कात्रज- चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील.
भूसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपूलाची निर्मिती, वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरुपात करावा, जेणेकरुन या भागातील सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाचा प्रयोग यशस्वी झाला असून वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे. त्यामुळे वनाज ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल अशा सुचना मोहळ यांनी हेल्या आहेत.
‘पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन भविष्याचा विचार करुन करणे गरजेचे आहे. मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुणे शहरात मेट्रोचे जाळे अधिक प्रमाणात विस्तारत आहे. मेट्रोच्या या विस्ताराचा अधिकाधिक पुणेकरांना फायदा व्हावा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रो जोडले जावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरीक हवाई वाहतूक राज्यमंत्री
Related
Articles
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
केईएम रुग्णालयात सहा वर्षांत १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू
07 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
केईएम रुग्णालयात सहा वर्षांत १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू
07 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
केईएम रुग्णालयात सहा वर्षांत १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू
07 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
केईएम रुग्णालयात सहा वर्षांत १ हजार १७६ अर्भकांचा मृत्यू
07 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
अमेरिकेचा अडसर (अग्रलेख)
5
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
6
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस