पाटणा : बिहारमधील गया जिल्ह्यात जनता दल युनायटेडच्या नेत्याची त्याच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.महेश मिश्रा असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. ते चिरायला पंचायतीचे गट सचिव होते. बेलागंज परिसरातील चुरीहारा गावात बुधवारी रात्री सशस्त्र हल्लेखोरांनी मिश्रा यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मिश्रा यांना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Fans
Followers