शार्दुल ठाकूरमुळे मुंबईचा विजय   

मुंबई : बीसीसीआयने आयोजित केलेल्या रणजी चषकाच्या सामन्यात मुंबईने मेघालयचा एक डाव आणि ४५६ धावांनी पराभव. या सामन्यात शार्दुल ठाकूरने दोन्ही डावात चार बळी घेतल्या.रणजी चषक २०२४-२५ च्या एलिट  अ गटाच्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने मेघालयचा एक डाव आणि ४५६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात शार्दुल ठाकूरने दोन्ही डावात चार बळी  घेतल्या. त्याने फलंदाजीने ८४ धावाही केल्या. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या पराभवानंतर, मुंबईसाठी बोनस गुणांसह विजय मिळवणे महत्त्वाचे होते. मुंबईच्या या बोनस विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आपल्या संधी जिवंत ठेवल्या.
 
शरद पवार क्रिकेट स्टेडियम अकादमी बीकेसी मुंबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर मेघालय संघ ८६ धावांवर ऑलआऊट झाला. मेघालयकडून प्रिंगसांगने १९, आकाश कुमारने १६, अनिश चरकने १७ आणि हिमानने २८ धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने हॅट्रिलसह चार विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेत मेघालयचा संघ लवकर संपुष्टात आणला. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने ३, शम्स मुलानीने १ आणि डिसूझाने २ विकेट घेतल्या.
 
मुंबईने पहिल्या डावात ६१७ धावांचा मोठा स्कोअर केला. मुंबईकडून सिद्धेश लाडने १४५, आकाश आनंदने १०३ आणि शम्स मुलानीने नाबाद १०० धावा केल्या. मुंबईकडून तीन फलंदाजांनी शतके ठोकले. त्याच्याशिवाय भारतीय संघाबाहेर असलेल्या शार्दुल ठाकूरनेही ८४ धावांची शानदार खेळी केली. तर अजिंक्य रहाणे ९६ धावांवर बाद झाला. तो त्याचे शतक झळकावण्यास हुकला. मेघालयकडून हिमानने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याशिवाय अनिश चरकने २ विकेट घेतल्या. मुंबई संघाने पहिल्या डावात ५८५ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर मेघालय दुसर्‍या डावात फक्त १२९ धावा करू शकला. 

Related Articles