बाल्कनीचा 'मेक ओव्हर'   

समृद्धी धायगुडे 

घरात सध्या हक्काने निवांत म्हणजे वीक एंडला बसायची जागा म्हणजे बाल्कनी दिवसभर उन्हाचा चटका सहन केल्यानंतर संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात स्मरणरंजन करण्याची हौस प्रत्येकाला असते.हा उन्हाळा आणखी थोडा सुसह्य करण्यासाठी अबाल्कनीचा मेक ओव्हर करून घेऊ शकता आणि तुमची बाल्कनी समर फ्रेंडली करू शकता. या साठी सोप्या टिप्स 
 
ऑकटोबर हिट आली की गार आणि मनाला आणि डोळ्यांना थंडावा देणाऱ्या गोष्टींकडे आपण वळतो. यात प्रामुख्याने माठ भरून ठेवणे, वाळ्याचे पडदे लावणे अशा गोष्टींना सुरुवात होते. संध्याकाळच्या वेळी घराच्या छोट्याश्या का होईना पण बाल्कनीत आपण रेंगाळतो. संधयाकाळी मंद वहाणार्या वाऱ्याबरोबर बाल्कनीत बसने म्हणजे एक सुखच. याच बाल्कनीमध्ये कधी मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर निवांत गप्पा गोष्टी किंवा बैठे खेळ देखील लहान मुले खेळतात. उन्हाळ्याच्या सुटीत बाल्कनीमध्ये रमणारी मुले बघून प्रत्येकालाच आपले बालपण आठवते. घर घेताना देखील हल्ली बाल्कनी आहे का? असेल तर ती किती मोठी असावी ? याबाबत जागरूकपणे विचार केला जातो. 
 
उन्हाळ्यात किमान दहा मिनिटे तरी बाल्कनीत आपण वेळ घालवतोय. हीच जागा जर दररोज वापरातील असेल तर तिथे आणखी प्रसन्न वाटण्यासाठी प्रयत्न केले जातात. बाल्कनी जास्तीत जास्त टापटीप ठेवण्यासाठी तिची सजावट करण्यासाठी छोटे-मोठे बदल यंदाच्या उन्हाळ्यासाठी करून घेऊ शकतो. 
 
नैसर्गिक बाबींवर भर : एप्रिल,मी महिन्यांत कडक उन्हात बाल्कनीत गारवा राखण्यासाठी कायम नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. सजावट करताना वेत, लाकूड, टेराकोटा, कॉटन इत्यादी गोष्टींचा वापर सुसह्य ठरतो. वॉल पेंटिंग, हँगिंग बेल, इतर काही सजावटीच्या गोष्टी वापरून हि जागा आणखीन हॅपनिंग करू शकता. या सजावटीमध्ये जास्तीत जास्त रंग संगतीचा विचार करून करावा. 
 
सहज सोपे हलवता येईल असे फर्निचर : बऱ्याच फ्लॅट्स आणि बंगल्यांमध्ये बाल्कनी छोटी असते त्यामुळे जागेचा पूर्ण वापर शक्य नसतो. उपलब्ध जागेत जास्तीत जास्त मोठे फर्निचर भरले तर अडचण होते. या उलट हलके फुलके फर्निचर बाल्कनीत ठेवले तर जागेची पुरेशी बचत होते. पर्यायाने जास्तीत जास्त लोकांची आसन क्षमता मिळते. फर्निचर हे सोयीनुसार घरात इतरत्र हलवत येईल असे असले तर बरे पडते. मॉडर्न इंटेरिअर मध्ये बजेट फ्रेंडली आणि जागा वाचवणारी भिंतीवर लावता येणारे फोल्डींगचे असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. 
 
आरामदायी झोका : गार वाऱ्याची झुळूक सुद्धा बाल्कनीत आनंद देऊन जाते. तसेच बाल्कनीत जर एक झोका आणि संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक ही देखील खूप सुखावणारी असते. पूर्वी पासूनच आपल्या घरात, जुनी घरे असतील तर पडवीत मोठा लाकडी झोका असायचा. ही जागा आता आधुनिक झोपाळ्यांनी घेतली आहे. लहान जनसाठी बबल स्विंग, हॅमॉक, असे विविध प्रकार आज बाजारात मिळतात. यातून तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य आणखीन खुलते. 
 
नेत्रसुखद हिरवे कार्पेट : हिरव्या रंगांच्या वापराने वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक राहते. बाल्कनीच्या सजावटीसाठी हिरवा रंग कधीही अल्हाददायकच असतो. तुम्हाला जर बागकामाची आवड असेल तर तुमच्या आवडीचे झाडे लावू शकता. झाडामुळे हवा खेळती राहते. पुरेशी जागा नसेल तर तुम्ही व्हर्टिकल गार्डांचा विचार करू शकता. या शिवाय हँगिंग प्लांटचा देखील वापर करता येऊ शकतो. खिडकीत एखादे शोभेचे झाड लावून खोलीला गारवा ठेवू शकता. याशिवाय बाल्कनीत झाडांसाठी आडोसा म्हणून वाळ्याचे पडदे लावू शकता. 

Related Articles