E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
महाराष्ट्र
अजित पवार नाराज
Samruddhi Dhayagude
03 Oct 2024
आणखी जागांसाठी शहांना साकडे
मुंबई, (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत चाललेल्या जागा वाटपाच्या घोळामुळे बसलेल्या दणक्यातून धडा शिकलेल्या महायुतीने यावेळी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जागावाटप पूर्ण करत आणले आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौर्यातील बैठकांनंतरही काही जागांचा तिढा कायम असला तरी स्पष्ट झालेल्या जागांपैकी उमेदवारांची पहिली यादी शिंदे यांच्या शिवसेनेने तयार ठेवली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने संमती दिली तर आजच (गुरूवारी) पहिल्या माळेला पहिली यादी जाहीर करण्याची योजना आहे. दरम्यान, जागावाटपाच्या सूत्रावर अजित पवार यांची राष्ट्रवादी नाराज असून, आणखी किमान १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल शहा यांची भेट घेऊन केल्याचे समजते.
हरयाना आणि जम्मू-काश्मीर विधानसभेची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार असून, त्यापूर्वीही महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे संकेत आहेत. त्यामुळे सरकारी व पक्षीय पातळीवरची लगबग वाढली आहे. सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल चाळीस निर्णय घेतल्यानंतर आज पुन्हा मंत्रिमंडळ बैठक होत आहे. मंत्रालयातही जोरदार लगबग सुरू आहे. दुसरीकडे, महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. काही ठिकाणी समोरच्या उमेदवारांवर रणनीती निश्चित होणार असली तरी प्लॅन ए, बी तयार आहेत. तर काही जागांबाबत अजूनही तिढा असून त्यात वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप केल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही, असे दिसते.
महायुतीत काही जागांचा अपवाद वगळता विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षांकडे राहणार आहेत. याबाबत सुरुवातीलाच निर्णय होऊन जवळपास दोनशे जागांचा विषय संपला होता. पण, उर्वरित ८५ ते ९० जागांसाठी मात्र बरीच चर्चा झाली. भाजपच्या स्वतःच्या १०४ व सहयोगी आमदारांच्या १० अशा ११४ जागा आहेत. याशिवाय ४० जागांसाठी त्यांचा आग्रह होता. त्यापैकी ३२ जागांवर निर्णय झाला असल्याचे समजते.
शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आले होते व दहा अपक्ष सोबत होते. त्यापैकी बच्चू कडू यांनी वेगळी वाट पकडली आहे. लोकसभेतील ‘स्ट्राईक रेट’च्या आधारावर शिंदे यांनी आणखी ५५ जागांवर दावा सांगितला होता. त्यापैकी ३० जागांवर तोडगा निघाल्याचे समजते. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार आले होते. परंतु, त्यातील अनेक जण परतीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अजित पवार यांना ५२ ते ५५ जागा सोडल्या जातील अशी चिन्हे आहेत. परंतु, अजित पवार यांनी ७० जागांचा आग्रह धरला आहे. यातील बहुतांश जागांवर त्यांची आणि शिंदे यांच्या शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे.
...तर, महायुतीची शंभर उमेदवारांची यादी आज
महायुतीतील अंतिम निर्णय झालेल्या व समोरचा उमेदवार कोणीही आला तरी आपला उमेदवार निश्चित असलेल्या लोकांची उमेदवारी जाहीर करावी, असे ठरले आहे. मंत्री व विद्यमान आमदारांची पहिली यादी तयार आहे. शिंदेसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच निर्णय अंतिम आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख मंत्री व आमदार पुन्हा निवडणुकीत उतरणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांचीही याला तयारी आहे. भाजपला मात्र औपचारिकता म्हणून का होईना; पण पक्षाच्या केंद्रीय निवड मंडळाची मंजुरी लागणार आहे. ती घेऊन आज घोषणा करायची का कसे, हे ठरेल असे सांगण्यात आले.
भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेले दोन दिवस मुंबईत होते. त्यांच्या या दौर्यादरम्यान जागावाटपाबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. याशिवाय काल अमित शहा व अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक झाली. शहा मुंबईत आल्यापासून राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या मागे होते. आणखी किमान १२ जागा वाढवून मिळाव्यात, राष्ट्रवादीला किमान ६५ ते ७० जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी त्यांचे नेते खूप आग्रही आहेत.
Related
Articles
आम्ही भाजपसोबतच राहणार
04 Jan 2025
अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराची गीतेवर शपथ
07 Jan 2025
महिलांना ट्रोल करणे संकुचित मानसिकतेचे प्रतिक
07 Jan 2025
घर खरेदी करणे झाले सोपे
08 Jan 2025
दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार
03 Jan 2025
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीची हत्या; दोघांना अटक
04 Jan 2025
आम्ही भाजपसोबतच राहणार
04 Jan 2025
अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराची गीतेवर शपथ
07 Jan 2025
महिलांना ट्रोल करणे संकुचित मानसिकतेचे प्रतिक
07 Jan 2025
घर खरेदी करणे झाले सोपे
08 Jan 2025
दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार
03 Jan 2025
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीची हत्या; दोघांना अटक
04 Jan 2025
आम्ही भाजपसोबतच राहणार
04 Jan 2025
अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराची गीतेवर शपथ
07 Jan 2025
महिलांना ट्रोल करणे संकुचित मानसिकतेचे प्रतिक
07 Jan 2025
घर खरेदी करणे झाले सोपे
08 Jan 2025
दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार
03 Jan 2025
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीची हत्या; दोघांना अटक
04 Jan 2025
आम्ही भाजपसोबतच राहणार
04 Jan 2025
अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराची गीतेवर शपथ
07 Jan 2025
महिलांना ट्रोल करणे संकुचित मानसिकतेचे प्रतिक
07 Jan 2025
घर खरेदी करणे झाले सोपे
08 Jan 2025
दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार
03 Jan 2025
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीची हत्या; दोघांना अटक
04 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वाभिमानाने सुटतील दिव्यांगांचे प्रश्न
2
शेअर बाजारात घसरण
3
इस्रायलचे ७२ तासांत गाझावर ९४ हवाई हल्ले
4
वाचक लिहितात
5
‘केसरी’ची दमदार वाटचाल (अग्रलेख)
6
‘मराठा’चे १४५ व्या वर्षात पदार्पण