शेअर बाजारात उसळी   

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेसने गुरूवारी प्रथमच ऐतिहासिक ८३ हजारांचा टप्पा गाठला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील विक्रमी पातळीवर स्थिरावला. यामुळे गुंतवणूकदारांची सहा लाख कोटींची कमाई झाली.काल सेन्सेस १,५९३.०३ अंकांची उसळी घेत सार्वकालिक ८३,११६.१९ अंकांवर पोहोचला. दिवसअखेर १,४३९.५५ अंकांच्या वाढीसह ८२,९६२.७१ या विक्रमी उच्चांकावर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीनेदेखील ऐतिसाहिक वाटचाल केली. निफ्टी ४७०.४५ अंकांच्या वाढीसह २५,३८८.९० च्या विक्रमी पातळीवर स्थिरावला. त्याआधी, सत्रातंर्गत व्यवहारात निफ्टीने ५१४.९ अंकाच्या वाढीसह २५,४३३.३५ हा सर्वकालीन उच्चांक गाठला. 
 
काल बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६६.६६ लाख कोटींवर पोहोचले. बुधवारी ते ४६०.७६ लाख कोटी होते. काल त्यामध्येे ५.९ लाख कोटींची भर पडली. 
 
सेन्सेसमधील ३० पैकी २९ कंपन्यांचे समभाग हिरव्या रंगात बंद झाले. केवळ ़एका कंपनीच समभाग लाल रंगात बंद झाले. तसेच, निफ्टीचे ५० पैकी ४९ कंपन्यांचे समभाग हिरव्या रंगात बंद झाले. 
 
भारती एअरटेल, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोटर्स, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेचे समभाग काल सर्वाधिक वधारले.दरम्यान, आशियातील सेऊल, टोकियो, हाँगकाँग बाजारात उलाढाल पाहायला मिळाली. शांघायच्या बाजारत किरकोळ वाढ झाली. तर युरोपीय बाजार तेजीत होते. 

Related Articles