E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
संपादकीय
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
Samruddhi Dhayagude
10 Sep 2024
मुंबई वार्तापत्र : अभय देशपांडे
समाज माध्यमांचा बोलबाला असलेल्या युगात जगाच्या कानाकोपर्यात घडणार्या घटना व त्याच्याशी संबंधित मजकूर आपल्या हातातल्या मोबाईलवर येऊन धडकत राहतो. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका छोट्या मंदिराचा फोटो खूप व्हायरल झाला होता. त्याचे कारण म्हणजे त्या छोट्या मंदिरावर कोणी तरी लिहिलेली भन्नाट अशी मनोकामना. त्या मंदिरावर लिहिले होते की, हे देवा तू सर्वांचे भले कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. अज्ञात भाविकांच्या डोयातील कल्पनेचे सर्वांना भारी कौतुक वाटले.
सत्ताधारी महायुतीत सध्या जे सुरू आहे, ते बघता त्यांनीही हीच कल्पना उचलून धरलेली दिसते. सरकारने आणलेल्या योजनांचे श्रेय घेण्यासाठी सरकारमधील तीन पक्षात ऑलिम्पिकच्या तोडीची रस्सीखेच सुरू आहे. महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय तिघांनाही असले तरी त्यातही आपण पहिल्या क्रमांकावर असावे यासाठी सर्वांचीच व त्यातही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक धडपड सुरू आहे.
अजित पवार यांनीच आपल्या अंदाजपत्रकाच्या भाषणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती; परंतु त्या दिवसापासून त्यांच्या पक्षाने या योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द सायलेंट केला. ते केवळ माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख करतात. मागच्या आठवड्यात त्यांच्या पक्षाच्या जाहिरातीत तर ही योजना अजित दादांची लाडकी बहीण योजना झाली. यावरून शिंदे सेनेचे व त्यांचे चांगलेच वाजले. मंत्रिमंडळ बैठकीत पण यावरून बरीच वादावादी झाली. दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्ती करावी लागली. युतीत असे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी एक कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी असे ठरले. त्यामुळे वाद थोडा शमला असला तरी तो संपलेला नाही व तो वेगवेगळ्या कारणांमुळे डोके वर काढत राहील.
महत्त्वाकांक्षी योजना
राज्याची आर्थिक स्थिती, कर्जाचा वाढलेला डोंगर आदी किरकोळ बाबींकडे फारसे लक्ष न देता, लोकसभेत पडलेला मतांचा खड्डा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना पोतडीतून बाहेर काढली गेली. त्यावर ४६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकी किमान साडेसात हजार रुपये देऊन पुन्हा सत्तेचे तिकीट मिळवण्याचा इरादा तिन्ही पक्षांचा आहे. फरक एवढाच की, सत्तेचा चेहरा आपला असावा असे अजित दादांच्या लोकांना आणि भाजपलाही वाटते. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होऊनही भाजपला पहिली अडीच वर्ष विरोधी बाकावर व नंतरची अडीच वर्ष सत्तेत; पण दुय्यम स्थानावर बसावे लागले. नकटं व्हावे, धाकटे होऊ नये असे म्हणतात. भाजपलाही हे धाकटेपण सतत डाचते. पुन्हा सत्ता आली तरी बिहार पॅटर्नप्रमाणे मुख्यमंत्रिपद कमी आमदार असले तरी शिंदेंकडेच राहील, अशी भीतीही त्यांना वाटते. इकडून तिकडे हनुमान उड्या मारूनही परत परत उप झालेल्या अजित पवारांना आता पुन्हा ’उप’ होण्याची इच्छा नाही. ते स्वतः म्हणतात की, मुख्यमंत्री व्हायला संख्याबळ लागते व ते माझ्याकडे नाही; पण त्यांच्या समर्थकांना घाई झाली. ते कधी पोस्टरवर, तर कधी गणपतीच्या देखाव्यातून अजित दादांना मुख्यमंत्री करत असतात. पुण्यात अजितदादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याचा देखावा गणेशोत्सवात उभारला आहे. कार्यकर्त्यांचा अतिउत्साह समजता येतो; पण पक्षाचे प्रवक्ते व विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही तर पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा व स्वप्न असल्याचे सांगितले. हे ध्येय गाठायचे तर अधिक आमदार लागतील. अधिक आमदार निवडून आणायचे असतील, तर अधिक जागा लढाव्या लागतील. त्यामुळे श्रेयाच्या लढाईनंतर विधानसभेच्या जागावाटपाची दोरीवरची कसरत करताना महायुतीच्या नेत्यांचा घामटा निघणार हे स्पष्ट दिसते आहे.
जागांचा जांगडगुत्ता!
विधानसभेच्या जागावाटपाबाबत कोणीही महायुतीतील तीन प्रमुख नेत्यांशिवाय दुसरे कोणीही बोलू नये, अशा वरिष्ठांकडून थेट सूचना असतानाही महायुतीतील सगळ्याच पक्षाचे वाचाळ नेते सतत नवे वाद निर्माण करत असतात. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचा पक्ष १२० जागा मागेल आणि शंभर जागा निवडून आणेल, असे जाहीर करून टाकले, तर दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाला जेवढ्या जागा द्याल, तेवढ्या जागा आपल्या पक्षाला मिळाल्या पाहिजे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. या दोघांच्या मागण्या मान्य करायच्या तर भाजपला केवळ प्रचाराचेच काम करावे लागेल. शिंदे गट फार टोकाची भूमिका घेणार नाही; पण अजितदादा गटाची सध्याची आक्रमक भूमिका सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. परवा गडचिरोलीतील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांना सोडणे ही माझी चूक होती, अशी जाहीर कबुली देऊन अजित पवारांनी आणखी एक धका दिला.
अजित पवार गटाचे मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ’वडिलांचं जितकं लेकीवर प्रेम असतं, तितकं प्रेम कुणीच करू शकत नाही. असे असताना तुम्ही जर घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरोबर नाही. समाजाला सुद्धा ते आवडत नाही. याचा अनुभव आम्हीपण घेतलेला आहे. झालेली चूक सुद्धा मी मान्य केली आहे. अशी प्रांजल कबुली अजित पवार यांनी दिली. वस्ताद सगळे डाव शिकवत असतो; पण एक डाव स्वत:साठी राखून ठेवत असतो. तो डाव दाखवून देण्याची वेळ कधीही आणून देऊ नये, अशी कबुली देताना त्यांनी काकांच्या संघर्षाची अप्रत्यक्ष प्रशंसाही केली. हे खरेच प्रांजळ मत होते की, सतत नकुशा म्हणून हिणवणार्या भाजपला दिलेला इशारा आहे? याबद्दल सगळेच साशंक आहेत. या स्थितीत जागावाटप कसे करायचे, कोणाला किती जागा सोडायचा? अशा पेचात भाजपचे धुरीण दिसतात. लोकसभेच्या ४८ जागा वाटताना युतीच्या नेत्यांची दमछाक झाली होती. यावेळी तर २८८ ची कसरत आहे.
जनतेसमोर शक्तीपीठ नमले!
शेतकर्यांच्या प्रखर विरोधामुळे प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’चा प्रकल्प सरकारला गुंडाळावा लागला आहे. या महामार्गासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागपूर ते गोव्या दरम्यान होणार्या या महामार्गासाठी १२ जिल्ह्यांतील २७ हजार एकर जमीन संपादित करण्यासाठी आवश्यकता होती. राज्य रस्ते विकास महामंडळाने जूनमध्ये भूसंपादन सुरू केले होते; मात्र या महामार्गाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून जोरदार विरोध होत होता.
लोकसभा निवडणुकीत शेतकर्यांच्या रोषाचा महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे किमान निवडणुका होईपर्यंत तरी प्रकल्प जैसे थे ठेवण्यासाठी महायुतीमधील अनेक मंत्री आणि आमदार आग्रही होते. जनमताच्या रेट्यामुळे केंद्राप्रमाणे राज्य सरकारलाही माघार घ्यावी लागली. लोकसभा निवडणुकीत स्वतःचे, स्वबळावरचे बहुमत गेल्याने केंद्रातील मोदी सरकार अनेक विषयांवर नमते घेत आहे. विरोधकांच्या आक्षेपांमुळे नरेंद्र मोदी सरकारला वफ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले. प्रस्तावित प्रसारण विधेयकाचा नवीन मसुदा परत घेतला. थेट भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला. निवडणूक आणि जनक्षोभ व सक्षम विरोधी पक्ष या तीनच बाबी सरकारला संवेदनशील व्हायला भाग पडतात. केंद्रात दिसले तेच आता राज्यातही दिसते आहे.
Related
Articles
दोन अवकाश याने जोडण्यात इस्रोला यश
17 Jan 2025
महाराष्ट्राचे ज्युदोचे संघ जाहीर
19 Jan 2025
कलंकित‘ट्यूलिप’!
19 Jan 2025
बसमधून महिलेची पर्स पळवली
18 Jan 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला आग
20 Jan 2025
नोव्हाक जोकोविचने मोडला फेडररचा विश्वविक्रम
17 Jan 2025
दोन अवकाश याने जोडण्यात इस्रोला यश
17 Jan 2025
महाराष्ट्राचे ज्युदोचे संघ जाहीर
19 Jan 2025
कलंकित‘ट्यूलिप’!
19 Jan 2025
बसमधून महिलेची पर्स पळवली
18 Jan 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला आग
20 Jan 2025
नोव्हाक जोकोविचने मोडला फेडररचा विश्वविक्रम
17 Jan 2025
दोन अवकाश याने जोडण्यात इस्रोला यश
17 Jan 2025
महाराष्ट्राचे ज्युदोचे संघ जाहीर
19 Jan 2025
कलंकित‘ट्यूलिप’!
19 Jan 2025
बसमधून महिलेची पर्स पळवली
18 Jan 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला आग
20 Jan 2025
नोव्हाक जोकोविचने मोडला फेडररचा विश्वविक्रम
17 Jan 2025
दोन अवकाश याने जोडण्यात इस्रोला यश
17 Jan 2025
महाराष्ट्राचे ज्युदोचे संघ जाहीर
19 Jan 2025
कलंकित‘ट्यूलिप’!
19 Jan 2025
बसमधून महिलेची पर्स पळवली
18 Jan 2025
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला आग
20 Jan 2025
नोव्हाक जोकोविचने मोडला फेडररचा विश्वविक्रम
17 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरटीई प्रवेश प्रक्रिया २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार
2
जबाबदारीचे तत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रूजावे
3
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
4
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
5
उद्धव गटाचे ‘स्वबळ’ (अग्रलेख)
6
वाचक लिहितात