गाझावरील हवाई हल्ल्यात १२ पॅलेस्टिनींचा मृत्यू   

डेर अल बालह  : इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी सकाळी हल्ले झाले होते. पोलिओ निर्मूलनासाठी आरोग्य कर्मचारी लशीकरण करत असताना हल्ला झाला होता. गाझात पोलिओचा एक रुग्ण २५ वर्षानंतर प्रथमच सापडला होता. एका दहा महिन्यांच्या मुलाला पोलिओ झाला होता. त्याचा एक पाय लुळा पडला होता.  त्यामुळे लशीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. संयुत राष्ट्राच्या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला होता. मध्य गाझातील ६ लाख ४० हजार मुलांचे लशीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दहा वर्षाखालील सर्व मुलांचे ते केले जाणार आहे. 
 
दुसर्‍या टप्प्यातील लशीकरण शनिवारी सुरू आहे. ते अखेरचे असणार आहे. त्यासाठी  खान युनूस आणि रफा परिसरात विविध केंद्रे उभारली आहेत. उत्तर भागातील लशीकरण उद्या (सोमवारी) पूर्ण होणार आहे. दरम्यान, इस्रालयने मध्य गाझातील नुसरत येथील निर्वासितांच्या छावण्यांच्या परिसरात लष्करी मोहीम सुरू केली आहे. दोन ठिकाणी केलल्या हवाई हल्ल्यात ९ जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती पॅलेस्टिनच्या आरोग्य खात्याने दिली. 
 
शनिवारी एका इमारतीवर हल्ला झाला होता. त्यात चौघांचा मृत्यू झाला असून, १० जखमी झाले आहेत. नुसरत येथील घरावरील हवाई हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. 

Related Articles