दूषित पाण्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू   

नालंदा : येथे दुषित पाणी प्यायल्यामुळे एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून अन्य ऩऊ विद्यार्थीनींवर उपचार चालू आहेत. येथील ’कस्तुरबा गांधी मुलींची शाळा‘ या शाळेत ही घटना घडली आहे. 
 
मृत्यूमुखी पडलेली विद्यार्थीनी दुसर्‍या शाळेतील होती. ती आपल्या मैत्रीणीला भेटण्यास या शाळेत आली होती. सोमवारी दुषित पाणी प्यायल्यामुळे काही विद्यार्थीनींच्या पोटात दुखत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करणयात आले होतेे. त्यावेळी उपचारांदरम्यान एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी शशांंक शुभंकर यांनी दिली. पाण्याचे फिल्टर शाळेत बसविल्यापासून अनेक विद्यार्थी आजारी पडत आहेत. त्यामुळे शाळांकडून या फिल्टर्सची व्यवस्थित देखभाल केली जात नसल्याचे स्पष्ट होते. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल असे शुभांकर यांनी पुढे नमूद केले.

Related Articles