कडक उन्हामुळे कलिंगडाला मागणी वाढली   

दर आटोक्यात असल्याने ग्राहकांची पसंती  

मंचर, (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून उन्हाळ्यात कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाचे दर आटोक्यात असल्याने सर्व स्तरातील ग्राहक कलिंगड खाण्यास पसंती देत असुन खाणार्‍यांच्या जीवाला गारवा मिळत आहेत. आंबेगाव तालुका हा बागायत तालुका असून दर उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक शेतकरी कलिंगड पिकाचे उत्पादन घेत असतात. सध्या कलींगडास गुणवत्तेनुसार व आकारानुसार १० ते १२ रुपये किलो दर मिळत असून अनेक व्यापारी शेतकर्‍याच्या शेतातच कलिंगड खरेदी करत आहे. गावागावात, मुख्य रस्त्यांच्या बाजूला अनेक छोटे मोठे व्यापारी कलिंगडाच्या विक्रीचे स्टॉल लावले असून ३०, ४०, ५०, ६० रुपये दराने कलिंगड विक्री करत आहे. 

Related Articles