E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हवामान बदलाचा फटका कर्नाटक हापूसला हंगाम उशिराने सुरु
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
पुणे
: लांबलेल्या पावसाचा फटका कर्नाटक हापूस आंब्याला बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. येत्या दहा दिवसांत कर्नाटक हापूसची आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. सध्या घाऊक बाजारात चार ते पाच डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला १२०० ते १८०० रुपये दर मिळत आहे. आवक वाढल्यानंतर दर आवाक्यात येणार आहेत.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कर्नाटकमध्ये हापूस आंब्याला चांगला मोहोर आला होता. मात्र, सातत्याने हवामानात बदल झाल्याने आंब्याच्या झाडांना फटका बसला. पावसामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर गळून पडला. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्यात बाजारात नेहमी प्रमाणे आवक होऊ शकली नाही. मात्र, आता झाडांवर असलेल्या फळांची स्थिती चांगली असल्याने येत्या १० ते १५ दिवसांत कर्नाटक हापूसची आवक वाढेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दर वर्षी ७०० ते ८०० पेटी आवक होत असते. मात्र, यंदा केवळ १५० ते २०० पेट्यांची आवक झाली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक अपेक्षित आहे. आवक वाढल्यानंतर दर आवाक्यात येतील,’ असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकर्याच्या अंदाजानुसार १५ एप्रिलनंतर चांगल्या प्रकारे आंब्याची आवक सुरू होईल. यंदा आंब्याची आवक १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या घाऊक बाजारात चार ते पाच डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला १२०० ते १८०० रुपये दर मिळत आहे. दोन डझनाच्या बॉक्सला ३०० ते ६०० रुपये दर मिळत आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात कर्नाटकाच्या विविध भागातून आंब्याची आवक होत आहे. मागील वर्षी मे महिन्यात २५ हजार पेट्यांची रोज आवक होत होती.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडपेयांसह आंब्यांची तपासणी सुरू केली आहे. आंबा पिकविण्यासाठी ‘कॅल्शिअम कार्बाइड’सह कृत्रिम रसायनांचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा ‘एफडीए’ने दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडपेय, बर्फासह आंबे आणि अन्य फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (जीबीएस) रुग्ण आढळून आले होते. दूषित पाणी, अन्नामुळे रुग्णांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे तपासणी आढळून आले होते. त्यामुळे अन्नपदार्थांची नियमीतपणे तपासणी करणे आवश्यक असल्याचा मुद्दा समोर आला होता.
Related
Articles
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा
18 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा
18 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा
18 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा
18 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!