E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
पुणे
: पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकीच झाली होती. यामध्ये घेवड्याच्या भावात काहीशी वाढ झाली असून मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.
गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थान येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरात येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक येथून २ टेम्पो भुईमुग शेंग, हिमाचल प्रदेश ५ ते ६ टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी ४ ते ५ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे ९ ते १० टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४५ ते ५० टेम्पो इतकी आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ६०० ते ६५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, भुईमुंग शेंग २ टेम्पो, मटार २ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमार ७५ ते ८० ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १००-१३० बटाटा : १३०- २०० लसूण : ३५०- १०००, आले सातारी: २५०-२७०, भेंडी : २००-४००, गवार : ३००- ५००, टोमॅटो : ८०- १३०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : ३००-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : ४०- ८०, वांगी : २००-४००, डिंगरी : ३००-३५० नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी : ५००-५५०, जाड : २५०-३००, शेवगा : १००-२००, गाजर : २५०-४००, वालवर : ५००-५५०, बीट : ७०-८०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००- १५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : स्थानिक: ५००-५५०, परराज्य : ५७०-६५०, पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : २५०-४००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
संत्रा महागला, गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी पपई आणि डाळींबाच्या भावात घसरण झाली असून संत्र्याच्या भावात वाढ झाली आहे तर कलिंगड, खरबूज, चिक्कू, अननस, मोसंबी, लिंबू आणि पेरुचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली़गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि.१३) फळबाजारात मोसंबी २५ ते ३० टन, संत्रा १५ ते २० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, अननस ६ ट्रक, पेरु २०० ते २५० क्रेट इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रतिगोणी) : ५००-२०००, मोसंबी : (३ डझन) : १८०- ३५०, (४ डझन) : ८०-२२०, संत्रा : (१० किलो) : ४५०-१७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१८०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-२५, कलिंगड : ७-१०, खरबूज : १०-१६, पपई : ८-१५, चिक्कू (दहा किलो) : १००-५००़ अननस (१ डझन): १००-६००़
कोथिंबीर, शेपू, कांदापात, राजगिरा, चुकाच्या भावात वाढ
गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि.१३) कोथिंबिरीची सुमारे १ लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली होती. आवक कमी झाल्याने शेकडा जुडीमागे कोथिंबीरच्या भावात २००, शेपू २००, कांदापात २००, राजगिरा आणि चुकाच्या भावात प्रत्येकी १०० रुपये इतकी भावात वाढ झाली होती. आवक जावक कायम असल्याने इतर सर्व पालेभाज्यांचे गेल्या आठवड्यातील दर स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१२००, मेथी : १२००-१५००, शेपू : ८००- १२००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ३००-६००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ३००-५००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००- ५००, चुका : ६००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१२००
फुलांच्या भावात वाढ
झेंडू, गुलछडीसह काही फुलांचे भाव ५ ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत़हनुमान जयंती आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे फुलांच्या मागणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे़ शोभिवंत फुलांना देखील मागणी चांगली आहे़ बाजारात आवक आणि मागणी देखील वाढली असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली़
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १२०-२००, अॅष्टर : जुडी १५- २०, सुट्टा ५०-१२०, कापरी : ३०-५०, शेवंती : ६०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ६०-१००, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १२०-१८०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-१००, जिप्सोफिला : १००-१६०, मोगरा : ८००-९००़
Related
Articles
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
22 Apr 2025
जप्त केलेल्या मिळकतींचा पालिकेकडून लिलाव
16 Apr 2025
हसिना यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट
16 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
22 Apr 2025
जप्त केलेल्या मिळकतींचा पालिकेकडून लिलाव
16 Apr 2025
हसिना यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट
16 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
22 Apr 2025
जप्त केलेल्या मिळकतींचा पालिकेकडून लिलाव
16 Apr 2025
हसिना यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट
16 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद
22 Apr 2025
जप्त केलेल्या मिळकतींचा पालिकेकडून लिलाव
16 Apr 2025
हसिना यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट
16 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
बनावट पासपोर्ट प्रकरण