बालिकेवर अत्याचार करणार्‍या आरोपीची तुरुंगात आत्महत्या   

मुंबई : कल्याणमधील बालिकेचे लैंगिक शोषण करुन तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळीने तळोजा तुरुंगात टॉवेलने गळफास घेऊन रविवारी पहाटे आत्महत्या केली. तळोजा तुरुंगातील स्वच्छतागृहात त्याने पहाटे साडे तीनच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सांगितलं जात आहे. मात्र त्याचे  वकील संजय धनके यांनी गवळीने  आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय  व्यक्त केला..अक्षय शिंदेची जशी हत्या करण्यात आली तशीच गवळीची होऊ शकते, असे ते म्हणाले,  तसा संशय आल्याने मी न्यायालयात विशालच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात अर्जही केला होता. दरम्यान काल पहाटे त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र माझ्या मते पोलिस यंत्रणेने त्याची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आाहे. बदलापूर शाळेत चिमुरडीवर अत्याचाराच्या प्रकरणानंतर कल्याणमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या झाली होती. 

Related Articles