E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निकृष्ट काम करणार्या दोन अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
ठेकेदार, सल्लागाराला काळ्या यादीत टाकणार
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहूनगर, चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम करण्यात आले आहे. ते काम अटी व शर्तीनुसार न झाल्याचा, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासणीनंतर त्याकामात अनियमितता झाल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी दोन अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. तसेच ठेकेदार व सल्लागाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
राजर्षी शाहू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम करण्यासाठी महापालिकेने १ कोटी ६६ लाखांचा खर्च केला. मात्र, निविदेतील अटी व शर्तीनुसार उद्यानाचे काम न झाल्याचा आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला होता. त्यांनी या कामात तब्बल १ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात भापकर यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी आयुक्त सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर महापालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागाने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांच्या भूशास्त्र विभागाच्या पथकाकडून कामाची तपासणी करून घेतली.
अहवालानुसार उद्यानात बसविलेले ट्रॅप स्टोन कमी आकाराचे आणि ऍल्युमिनियम दंडगोलाकार २० पोल बसविणे अपेक्षित असताना ते सातच बसविल्याचे आढळून आले. यासह त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान करणे, सुधारित अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता न घेणे, जास्तीच्या कामांना मान्यता न घेणे आदी आक्षेप चौकशीतून समोर आले. त्यावरून हलगर्जीपणा व शिथिल पर्यवेक्षणाचा ठपका ठेवत कार्यकारी अभियंता सुनीलदत्त नरोटे व कनिष्ठ अभियंता अस्मिता साळुंखे यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहे. यासह कामात सल्लागार हार्दिक पांचाळ ऍण्ड असोसिएट्स व संबंधित काम करणारा ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यास शहर अभियंत्यांना सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. मात्र उद्यानात ६ हजार ७८६ रुपये प्रतिचौरस मीटर ट्रॅप स्टोन दगडाऐवजी ४१४ रुपये प्रतिचौरस मीटर किंमतीचा दगड बसविण्यात आला. त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोषी अधिकार्यांवर कारवाई करणार
राजर्षी शाहू उद्यानाच्या कामाबाबत तपासणीनंतर दोन अभियंत्यांविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणातील संबंधित सल्लागार व ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त होताच त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
Related
Articles
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
गाझा लेबानानसह सीरियामध्ये सैन्य तुकड्या कायम ठेवणार
21 Apr 2025
कांगोमध्ये तेलवाहू बोटीवर आगीचा भडका; १४३ बळी
20 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
जेन्सोल इंजिनिअरिंग : भरभराट ते घसरणीचा प्रवास
21 Apr 2025
’समाज कल्याण’च्या सहायक आयुक्ताला लाच घेताना पकडले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
3
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
4
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
5
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
6
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)