E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महात्मा फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकर विचार प्रबोधनपर्वचे उद्घाटन उत्साहात
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
पिंपरी
: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्व २०२५ चे आयोजन ११ ते १६ एप्रिल या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भीमसृष्टी), पिंपरी येथे करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, कामगार नेते तुकाराम गायकवाड, गणेश भोसले, उपअभियंता चंद्रकांत कुंभार तसेच सतिश वाघमारे व महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रबोधनपर्वाची सुरूवात मी जोतीबाची सावित्री या प्रज्ञा गवळी यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने झाली. या नाट्यप्रयोगात प्रज्ञा गवळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या उज्ज्वल कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा उहापोह आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला. त्यानंतर समता कला मंच प्रस्तुत शाहिरी जलसा हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सागर येल्लाळे, सुनिल गायकवाड, मारूती जकाते, वैशाली नगराळे, भारत लोणारे यांनी गीतगायनाचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
दुपारच्या सत्रात ख्यातनाम युवा कव्वाल सुरज आतिश यांचा समाज प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सुरज आतिश यांनी कव्वालीच्या सहाय्याने महापुरूषांच्या विचारांचा जागर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत गुलामांच्या उतरंडी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या माध्यमातून प्रभाकर पवार आणि सहकार्यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातील प्रसंग प्रेक्षकांसमोर अभिनयाच्या माध्यमातून मांडले.
संविधान शिल्पकार या महानाट्याचे आयोजन
१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि भारताच्या संविधान निर्मितीवर आधारित, प्रकाश आणि ध्वनीचा सुरेख संगम असणारे, संजय जीवने दिग्दर्शित आणि द बोधिसत्व फाऊंडेशन, नागपूर प्रस्तुत संविधान शिल्पकार या महानाट्याचे आयोजन पिंपरी येथील एच. ए. मैदान येथे करण्यात आले आहे. या महानाटकामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा, गीत, नृत्य आणि ढोल-ताशा पथकावर रॅप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत युगनायक फेम सुप्रसिद्ध अभिनेते अथर्व कर्वे, माता रमाई यांच्या भूमिकेत अनेक पारितोषिक प्राप्त नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने यांच्यासह अनेक सिने आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार आहे.
Related
Articles
बटलरमुळे गुजरातचा विजय
20 Apr 2025
’समाज कल्याण’च्या सहायक आयुक्ताला लाच घेताना पकडले
21 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
एम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
23 Apr 2025
ओलिसांची सुटका केल्याबद्दल पुतीन यांनी मानले हमासचे आभार
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
बटलरमुळे गुजरातचा विजय
20 Apr 2025
’समाज कल्याण’च्या सहायक आयुक्ताला लाच घेताना पकडले
21 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
एम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
23 Apr 2025
ओलिसांची सुटका केल्याबद्दल पुतीन यांनी मानले हमासचे आभार
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
बटलरमुळे गुजरातचा विजय
20 Apr 2025
’समाज कल्याण’च्या सहायक आयुक्ताला लाच घेताना पकडले
21 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
एम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
23 Apr 2025
ओलिसांची सुटका केल्याबद्दल पुतीन यांनी मानले हमासचे आभार
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
बटलरमुळे गुजरातचा विजय
20 Apr 2025
’समाज कल्याण’च्या सहायक आयुक्ताला लाच घेताना पकडले
21 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
एम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
23 Apr 2025
ओलिसांची सुटका केल्याबद्दल पुतीन यांनी मानले हमासचे आभार
18 Apr 2025
रोहित शर्मा मुंबई लीगच्या तिसर्या हंगामाचा चेहरा
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
राज-उद्धव एकत्र येणार?
5
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
6
ससूनचा अहवाल सादर