E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
तळेगाव दाभाडे
: मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात शनिवारी हनुमान जन्मोत्सव उत्सव मोठ्या भक्तीभावाने व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, भजनं, कीर्तनं आणि महापूजा यांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील हनुमान मंदिरांमध्ये पहाटे अभिषेक व महापूजेसह भजनं केली गेली. सूर्योदयापूर्वी या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. काही ठिकाणी हनुमान जन्माची गोड कथा सांगणारे प्रवचन आयोजित केले गेले. याव्यतिरिक्त हनुमान जन्माचा पाळणा महिलांनी व भजनकरांनी गायलाही.
सकाळी मंदिरांमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हनुमान जन्मानंतर मंदिरांमध्ये सुंटवडा, पेढे, नारळ आणि इतर गोड प्रसाद वाटले गेले. तसेच विविध स्थानिक मंदिरांमध्ये रंगबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मारुती मंदिरांमध्ये गाभार्याला विविध फुलांनी सजवले गेले होते, तर मंदिराबाहेर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.तसेच, मंदिराच्या समोर भव्य मंडप उभारून ध्वनीक्षेपकावर हनुमानजीची भजनं व गीतं लावली जात होती. मंदिरावर विविध रंगांची रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले होते.
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते महाआरती घेण्यात आली. यानंतर, भजनी मंडळांनी आपापली सेवा मंदिरात रुजू केली. काही गावांमध्ये पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात भजनं, ढोल आणि लेझीम यांचे संगीत वाजवले गेले. याच वेळी भक्तीभावाने ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली.श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये वार्षिक उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
वडगाव, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी, साते, जांभूळ, कान्हेफाटा, चिखलसे यांसारख्या गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. याशिवाय, काही ठिकाणी भजनी, भारुड, तमाशा तसेच ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक घरात जाऊन पालखीची आरती घेण्यात आली आणि ओवाळणी करण्यात आली.हनुमान जन्मोत्सवाच्या सणाने मावळ तालुक्यात एकत्र येऊन एक नवा भक्तिरंग तयार केला, ज्याने गावभर धार्मिक वातावरण निर्माण केले.
Related
Articles
इंटरनेटची केबल टाकताना महावितरणची वीजवाहिनी जळाली
20 Apr 2025
दिल्लीतील बंगला सोडण्यास न्यायाधीश वर्मा यांचा नकार
22 Apr 2025
माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार
18 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
संमेलनामुळे दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट
18 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!