हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय   

हैदराबाद : आयपीएलमध्ये  शनिवारी रंगलेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या संघाने ८ फलंदाज राखून पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविला. अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकी खेळीमुळे हैदराबादला वर्चस्व गाजविता आले. 
 
सलामीवीर अभिषेक शर्मा याने ५५ चेंडूत १४१ धावा केल्या. त्याला हेड याने ६६ धावा करत चांगली साथ दिली. क्लासेन याने नाबाद २१ धावा केल्या. त्याला साथ देताना इशान किशन याने नाबाद ९ धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांपैकी हर्षल पटेल याने ४ फलंदाज बाद केले. इशान मलिंगा याने २ बळी टिपले.   
त्याआधी पंजाबच्या संघाने २० षटकांत २४५ धावा केल्या. होत्या. त्यामुळे २४६ धावांचे आव्हान हैदराबादला मिळाले होते. पंजाबच्या फलंदाजांनी केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे संघाला दोनशेपार जाता आले. यावेळी कर्णधार श्रेयस अय्यर याने ३६ चेंडूत ८२ धावा केल्या.  या सामन्यात झालेल्या तुफानी अर्धशतकाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
 
पंजाबकडून फलंदाजी करताना सलामीवीर प्रियांश आर्या याने ३६ धावा केल्या. हर्षल पटेल याने त्याला नितीश रेड्डीकडे झेलबाद केले.  दुसर्‍या क्रमांकावर आलेला प्रभासिमरन हा ४२ धावांवर इशान मलिंगा याच्या गोलंदाजीवर कमिन्सकडे झेलबाद झाला. त्यानंतर मधल्या फळीतील नेहल वढेरा याने २७ धावा केल्या. इशान मलिंगा याने त्याला पायचित बाद केले.  शशांक सिंग अवघ्या २ धावांवर हर्षल पटेल याच्या गोलंदाजीवर पायचित बाद झाला. मॅक्सवेल याने ३ धावा केल्या. हर्षल पटेल याने त्याचा त्रिफळा उडविला. स्टॉयनिस हा ३४ धावांर नाबाद राहिला. जेसन याने नाबाद ५ धावा केल्या. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
हैदराबाद : अभिषेक शर्मा १४१, हेड ६६, क्लासेन नाबाद २१, इशान किशन नाबाद ९, अवांतर १०, एकूण १८.३ षटकांत २४७/२
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर ८२, प्रियांश आर्या ३६, प्रभासिमरन ४२, नेहल वढेरा २७,शशांक सिंग २, मॅक्सवेल ३, स्टॉयनिस ३४, जेसन ५ एकूण : २० षटकांत २४५/६

Related Articles