आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?   

लंडन : आयसीसी आगामी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत मोठे बदल करण्यासाठी परवानगी देवू शकते.  त्यानंतर मोठे बदल देखील यामध्ये होवू शकतात.  याबाबत मागील आठवड्यात झिम्बाब्वेमध्ये होणार्‍या बैठकीत कसोटी क्रिकेटला दोन स्तरांमध्ये विभाजित करण्यासाठी देण्यात येणार्‍या प्रस्तावाला स्थगित करण्याची शक्यता आहे. अशी माहीती शनिवारी देण्यात आली. खेळासाठी करण्यात आलेल्या प्रशासकीय आधिकार्‍यांनी म्हटले आहे की विजयानंतर विजेता संघाने किती फरकाने सामना जिंकला आहे यावरून देण्यात येणारे अतिरिक्त गुण देण्याची पद्धत ही कठीण आहे.
 
साधारण अशी गुण देण्याची पद्धत कसोटी क्रिकेट प्रमाणे बाकी इतर खेळांमध्ये देखील आहे. आता आगामी काळात भारतीय कसोटी संघ हा जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी घेण्यात येणार्‍या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जून महिन्यात जाणार आहे. यामध्ये भारतीय संघ ५ कसोटी सामने खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेदरम्यान २०२३-२०२५ या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद कसोटीचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना लॉर्डस या मैदानावर होणार आहे.  

Related Articles