E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
सर्वात खास तारीख
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
मडविकेट,कौस्तुभ चाटे
वीस वर्षे म्हणजे एक मोठा काळ. आपण १२ वर्षांचं एक तप असं गृहीत धरलं तर साधारण २ तपे, म्हणजे २-३ पिढ्या. खरोखर मोठा काळ. आणि क्रिकेटचा विचार करायचा झाला तर खरोखरच खूप वर्षांपूर्वी असंच म्हणावं लागतं. आता क्रिकेटमध्ये मागच्या स्पर्धेत काय घडलं, किंवा आयपीएल सारख्या स्पर्धेत अगदी २ आठवड्यांपूर्वी काय घडलं हे पण लक्षात ठेवणं अवघड असतं, तर वीस वर्षांपूर्वी काय घडलं याची नोंद कोण ठेवणार?
पण २१ वर्षांपूर्वी, कालच्या दिवशी, म्हणजे १२ एप्रिल २००४ रोजी क्रिकेटमध्ये इतिहास घडला. ब्रायन चार्ल्स लारा नामक जादूगाराने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच चारशे धावा केल्या. त्याची ही नाबाद ४०० धावांची खेळी म्हणजे कसोटी क्रिकेटमधील एक अप्रतिम खेळी आहे. या जादुई खेळीचे वर्णन करताना एक क्रिकेट समीक्षक लिहितात - ’बॅट हे लाराच्या हातातलं जणू वाद्य होतं, आणि त्याचा प्रत्येक फटका म्हणजे जणू संगीतच. इंग्लंडविरुद्ध केलेल्या या खेळीचे महत्त्व वेगळेच आहे, कारण काही दिवसांपूर्वी मॅथ्यू हेडनने लाराचाच सर्वोच्च धावांचा विक्रम मोडला होता. १९९४ मध्ये ब्रायन लाराने इंग्लंडविरुद्धच ३७५ धावा करून विक्रम केला होता. तो विक्रम मोडताना हेडनने ३८० धावा केल्या होत्या. कदाचित लाराला त्याचा विक्रम मोडणे मान्य नव्हते. त्याने परत एकदा तो विक्रम आपल्या नावावर तर केलाच पण कसोटी क्रिकेटमधलं पहिलंवहिलं चतुःशतक (४०० धावा) आपल्या नावावर केलं.
ब्रायन चार्ल्स लारा हा खर्या अर्थाने ९० च्या दशकातील क्रिकेटचा राजपुत्र होता. त्रिनिदादच्या या फलंदाजाने अगदी सुरुवातीपासूनच जागतिक क्रिकेटवर राज्य केले. त्याचंं पाहिलंच शतक गाजलं. सिडनीच्या ऐतिहासिक मैदानावर त्याने २७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो धावांची टांकसाळ घेऊनच बसला होता. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, भारत... सगळ्याच प्रतिस्पर्ध्यांवर तो वर्चस्व गाजवत होता. १९९४ मध्ये अँटिगा रिक्रिएशन ग्राउंड वर त्याने इंग्लंडविरुद्ध ३७५ धावा केल्या. ती विक्रमी खेळी होती. तिची नशा ओसरत होती आणि तेवढ्यात त्याने काउंटी क्रिकेटमध्ये नाबाद ५०१ धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमधला तो विक्रम इतक्या वर्षांनंतर देखील अबाधित आहे. दुर्दैवाने वेस्टइंडीज क्रिकेटला त्या काळात ग्रहण लागायला सुरुवात झाली होती. वेस्टइंडीज क्रिकेटने उपभोगलेलं साम्राज्य खालसा होत होतं. पण तरीही लारा खंबीरपणे लढत होता. लाराची फलंदाजी म्हणजे नज़ाकत होती. फॉर्म मध्ये असलेल्या ब्रायन लाराला फलंदाजी करताना बघणं म्हणजे सोहळा असायचा. त्याचे ड्राइव्ह, त्याची बॅकलिफ्ट, त्याचे पदलालित्य सगळंच खास होतं.
२००४ मध्ये इंग्लंडचा संघ वेस्टइंडीजच्या दौर्यावर होता. पारंपरिक विस्डेन ट्रॉफीसाठी दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. मायकल वॉनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ तसा बळकट होता. अँड्र्यू स्ट्राउस, ट्रेस्कोथिक, नासिर हुसेन, ग्रॅहम थॉर्प, मार्क बूचर सारखे दर्जेदार फलंदाज, अँड्र्यू फ्लिटाँफ सारखा उत्कृष्ट अष्टपैलू आणि हार्मिसन, होगार्ड, ऍशली जाईल्स आणि नव्या दमाचा जेम्स अँडरसन अशी तंगडी गोलंदाजीची फळी होती. त्या तुलनेत लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ ठीकठाकच वाटत होता. तशीही त्यांची उतरती कळा सुरु होतीच. इंग्लिश संघाने त्यांना या मालिकेत पुरतं नमवलं होतं. जमैका, त्रिनिदाद आणि बार्बाडोस असे पहिले तीनही सामने इंग्लंडने सहज जिंकले होते. इंग्लिश खेळाडू जणू सुटीचा आनंद घेत ती मालिका खेळत होते. हार्मिसन-होगार्ड या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा कणा मोडला होता तर इंग्लिश फलंदाज देखील त्या वेस्टइंडीजच्या खेळपट्ट्यांवर आपली छाप सोडत होते.
पहिल्या तीनही कसोटी जिंकून इंग्लिश संघाने मालिका खिशात घातली होती, या मालिकेत वेस्टइंडीजच्या फलंदाजांना सूर गवसत नव्हता. पहिल्या कसोटीत पहिल्या डावातील ३११ वगळले तर त्यांची गाडी २००-२२४ च्या पलीकडे जात नव्हती. मालिकेत दोन वेळा तर ते १०० चा आकडा पण पार करू शकले नव्हते. आणि तशातच चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ अँटिगामध्ये दाखल झाले होते.अँटिगा रिक्रिएशन ग्राऊंडची खेळपट्टी फलंदाजांना धार्जिणी होती. इथे टिकून राहिलं तर धावा निघणार होत्या, पण टिकणे आवश्यक होते. वेस्टइंडीजने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीची काही षटके बरी गेली, पण १४व्या षटकातच ब्रायन लारा फलंदाजीला आला. हळूहळू त्याने आपला जम बसवायला सुरुवात केली. त्याचे इतर साथीदार, ख्रिस गेल. रामनरेश सारवान. रिकार्डो पॉवेल आणि रायन हाईंड्स एक एक करत बाद होत गेले आणि सरतेशेवटी यष्टीरक्षक रिडले जेकब्स फलंदाजीला आला तेव्हा लारा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या खेळीकडे मार्गक्रमण करत होता. त्याची आणि जेकब्सची जोडी जमली. त्या खेळपट्टीवर त्याने आपला जम बसवालाच. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो ३१३ धावांवर नाबाद होता.
सोमवार, १२ एप्रिल २००४, कसोटी सामन्याचा तिसरा दिवस.लारा आणि जेकब्स जोडीने परत एकदा धावा जमवायला सुरुवात केली. इंग्लिश गोलंदाज त्या पाटा खेळपट्टीवर हतबल झाले होते. दोन्ही फलंदाजांनी त्यांची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढायला सुरुवात केली होती. त्या दिवशी लंचच्या वेळी खेळ थांबला तेव्हा लारा ३८४ वर खेळत होता. त्याने आपल्या ३७५ धावा कधीच मागे टाकल्या होत्या, आणि हेडनचा ३८० चा विक्रम देखील. आता सगळ्यांचीच नजर होती ती एका मोठ्या विक्रमाकडे. पुन्हा एकदा खेळ सुरु झाला तेव्हा क्रिकेट विश्वाचं लक्ष अँटिगा मैदानावर होतं. हळूहळू तो त्या मैलाच्या दगडाकडे मार्गक्रमण करत होता. इंग्लिश संघ टाकत असलेले ते २०२ वे षटक होते. इंग्लिश ऑफ स्पिनर गॅरेथ बॅटी ते षटक टाकत होता. षटकातील सहावा आणि शेवटचा चेंडू, लाराने तो स्वीप केला आणि पळून एक धाव घेतली. त्या क्षणी क्रिकेट विश्वात हलकल्लोळ झाला होता. ब्रायन लाराने तब्बल ४०० धावा केल्या होत्या. न भूतो न भविष्यती अशी घटना घडली होती. अँटिगाच्या त्या मैदानावर इतिहास निर्मिला गेला होता. ज्या मैदानावर १० वर्षांपूर्वी लारानेच ३७५ धावा केल्या होत्या, त्याच मैदानावर तो त्याच संघाविरुद्ध नाबाद ४०० करून उभा ठाकला होता. ब्रायन लाराचे नाव क्रिकेट इतिहासाच्या सुवर्णपानांवर कोरलं गेलं होतं.
त्यानंतर पुढे त्या सामन्यात काय झाले याची तांत्रिक दृष्ट्या नोंद नक्की आहे. ते कथानक केवळ आकड्यांपुरतं मर्यादित राहिलं. पण आज इतक्या वर्षांनंतर देखील तो सामना म्हणजे ब्रायन लाराच्या ४०० धावा म्हणूनच ओळखला जातो आणि यापुढेही तसाच ओळखला जाईल. एक गमतीची गोष्ट म्हणजे इंग्लिश खेळाडू ग्रॅहम थॉर्प आणि ऑस्ट्रेलियन पंच डेरेल हेअर हे दोघेही या दोन्ही खेळी अनुभवायला मैदानावर उपस्थित होते. २००४ ची ही गोष्ट अजूनही तशीच ताजी आहे, आणि कायम राहील.
गेल्या २० वर्षांमध्ये क्रिकेट खूप बदललं आहे. फलंदाजी अजूनच आक्रमक झाली आहे. टी-२० च्या प्रभावामुळे तर फलंदाजी करणे म्हणजे जादूची कांडी फिरवण्याइतके सोपे झाले आहे, पण तरीही हा विक्रम कोणी मोडू शकेल असे वाटत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये इतकी मोठी खेळी करण्याचा संयम आजच्या जमान्यातील फलंदाजांकडे नक्कीच नाही. ब्रायन लारा, त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज. त्याची खेळी बघणे ही मौज असायची. २१ वर्षांपूर्वी तो मैदानावर उतरला तो निर्मल आनंद देण्यासाठीच. क्रिकेटच्या इतिहासात ती खेळी सर्वोत्तम आहे यात काहीच वाद नाही.ब्रायन लाराची ही केवळ खेळी नव्हती, तर क्रिकेट या खेळावर प्रेम करणार्या प्रत्येकासाठी ती एक भावना आहे, आणि ती कायम राहणार आहे.
Related
Articles
आता अपघातग्रस्तांवर होणार एक लाखापर्यंत मोफत उपचार
19 Apr 2025
‘आयपीएल’ चं १८ वं वरीस..
20 Apr 2025
गाझा, लेबानानसह सीरियामध्ये सैन्य तुकड्या कायम ठेवणार
18 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
श्री यमाई देवीचा यात्रोत्सव उत्साहात
15 Apr 2025
आता अपघातग्रस्तांवर होणार एक लाखापर्यंत मोफत उपचार
19 Apr 2025
‘आयपीएल’ चं १८ वं वरीस..
20 Apr 2025
गाझा, लेबानानसह सीरियामध्ये सैन्य तुकड्या कायम ठेवणार
18 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
श्री यमाई देवीचा यात्रोत्सव उत्साहात
15 Apr 2025
आता अपघातग्रस्तांवर होणार एक लाखापर्यंत मोफत उपचार
19 Apr 2025
‘आयपीएल’ चं १८ वं वरीस..
20 Apr 2025
गाझा, लेबानानसह सीरियामध्ये सैन्य तुकड्या कायम ठेवणार
18 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
श्री यमाई देवीचा यात्रोत्सव उत्साहात
15 Apr 2025
आता अपघातग्रस्तांवर होणार एक लाखापर्यंत मोफत उपचार
19 Apr 2025
‘आयपीएल’ चं १८ वं वरीस..
20 Apr 2025
गाझा, लेबानानसह सीरियामध्ये सैन्य तुकड्या कायम ठेवणार
18 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
श्री यमाई देवीचा यात्रोत्सव उत्साहात
15 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
निकाल लवकर लागो (अग्रलेख)
2
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
3
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
4
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
5
धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत
6
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक