स्लोव्हाकियात ‘एक झाड आईसाठी’ उपक्रम राबविणार   

ब्रातिस्लाव्हा : एक झाड आईच्या नावाने लावा, असे आवााहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते  त्याचे स्वागत स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी केले असून असा उपक्रम स्लोव्हकियात राबविण्याचा विचार करु, असे सांगितले.
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या स्लोव्हकिया दौर्‍यावर गेल्या होत्या .गुरुवारी त्यांच्या हस्ते नित्रा शहरात वृक्षारोपण झाले.  नायट्रा शहर स्लोव्हाकियाचे सर्वात जुने शहर मानले जाते सुमारे ब्रातिस्लाव्हापासून सुमारे १०० किलोमीटरवर शहर असून तेथे टाटा मोटर्स, जेएलआर प्रकल्प देखील आहे. तेथे भारताची मोठी गुंतणूक आहे. दौर्‍यात मुर्मू यांनी प्रकल्पाला भेट दिली होती. यानंतर झालेल्या वृक्षारोपण कार्यक़्रमात मुर्मू यांनी एक झाड आईच्या नावाने लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे सांगितले. ही कल्पना अतिशय आवडल्याचे  पीटर पेलेग्रिनी सांगितले असून असा उपक्रम देशातही राबविणार असल्याचे 
ते म्हणाले. 

Related Articles