युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा शस्त्रे, दारुगोळा देणार   

लंडन : रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला सर्व ती मदत आणि सहकार्य केले जाणार आहे. तसेच पाठिंबा असेल, असे  ब्रिटनने शुक्रवारी जाहीर केले. युक्रेनला लष्करी मदत, शस्त्रे आणि दारुगोळा यांचा पुरवठा केला जाणार आहे. नार्वेसोबत ब्रिटन संयुक्तपणे युक्रेनला ५८० दशलक्ष डॉलर्सचे हजारो ड्रोन, रडार यंत्रणा आणि रणगाडा विरोधी भुसुरुंग पुरविणार आहे. युद्ध विषयक वाहनांची देखभाल देखील केली जाणार आहे. 
 
ब्रसेल्स येथे नाटो राष्ट्रांचे मुख्यालय आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमेरोव्ह यांनी आवाहन केले होते की, युक्रेनला पेट्रियट सारखी आधुनिक क्षेपणास्त्रे हवी आहेत. त्या माध्यमातून रशियाच्या हवााई हल्ले रोखता येतील. याबाबत राजकीय निर्णय तातडीने घ्यावा. त्यामुळे शहरे, गावे यांचे संरक्षण हवाई हल्ल्यापासून करता येणे सोपे जाईल, असे ते म्हणाले . दरम्यान, अशाच प्रकारची मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी केली होती. आठवड्यापूर्वी रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात २० नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर हवाई संरक्षणा विषय अधिकच गंभीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Related Articles