भराड गोंधळाचा घट सोहळा उत्साहात   

मंचर, (प्रतिनिधी) : धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन श्री भैरवनाथ मंदिरात शुक्रवारी पाच नामाचे भराड गोंधळाच्याघटाचा कार्यक्रम सदानंदाचा येळकोट,भैरवनाथाचे चांगभले व अंबाबाईचा उदे उदे असा जयघोष करुन व भंडारा उधळून झाला, अशी माहिती भैरवनाथ देवस्थानाचे सेवेकरी समस्त रोडे मंडळीनी यांनी दिली.
      
दरवर्षी चैत्री पोंणिमेच्या अगोदरच्या दिवशी धामणी येथील या भैरवनाथ मंदिरात समस्त रोडे व जाधव पाटील मंडळीच्या वतीने भैरवनाथाचे भराडाचे घट बसवून त्या ठिकाणी भराड्याकडून भैरवनाथाचे पाच नाम भराड गोंधळ घालण्यात येतो. पूर्वीपासून चालत असलेली पाच नामाच्या भराड गोंधळाची परंपरा रोडे व जाधव जथेकर्यांनी जपलेली आहे. फार पूर्वीपासून चंपाषष्ठीला खंडोबाचे पाच नामाचे जागरण करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे येथील भैरवनाथ मंदिराच्या  आवारात चैत्र चर्तुदशीला भराड घटाला मंदिराच्या आवारात खूप गर्दी होऊन जागा पुरत नसायची आता रोडे,जाधव आडनावाच्या मंडळीनी ही प्रथा सुरु ठेवलेली आहे. असे जुन्या मंडळीनी सांगितले.यावेळी कैलास रोडे, आबासाहेब रोडे, गोपाळ रोडे, शांताराम रोडे, निलेश रोडे, अक्षय रोडे, सुहास रोडे, किसनराव रोडे, सुरेश रोडे, चंद्रकांत रोडे, जयसिंग रोडे,विकास रोडे, बबन रोडे, काळूराम रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles