नवी दिल्ली : स्टंट डिझाईन श्रेणीतील ऑस्करचा पुरस्कार देखील राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटाला देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती इन्स्टाग्रामवर देण्यात आली आहे. चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार यापूर्वी २०२३ मध्ये देण्यात आला होेता.आता चित्रपटातील थरारक हाणामारीबद्दलचा पुरस्कारही देण्यात येत असल्याची घोषणा ऑस्कर समितीकडून करण्यात आली आहे ज्युनिअर एनटीआर हाणामारीत वाघाच्या दिशेने झेप घेत असल्याचे दृश्य गाजले होते. त्याची निवड पुरस्कारासाठी केल्याची माहिती अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस आणि सायन्सने इन्स्टाग्रामवर दिली आहे.
Fans
Followers