माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर   

पुणे :- दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर पैशांअभावी उपचार नाकारल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तनिषा भिसे (वय २७) या गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना २९ मार्चला घडली होती. राज्यातून संताप व्यक्त झाल्यानंतर सरकारने आणि महिला आयोगाने याची दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माता मृत्यू अन्वेषण समितीकडून चौकशी होणार आणि त्याचा अहवाल येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी पुणे महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी समाज माध्यमातून दिली.
 
चाकणकर म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल ८ एप्रिलला विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला आहे. या विभागाने हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. तसेच, शुक्रवारी पुणे महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आला. या दोन्ही चौकशी अहवालावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी अशी राज्य महिला आयोगाची मागणी आहे.
 
राज्यसमितीच्या वतीने जी समिती केलेली होती. डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती होती. तर समितीचा शासनाचा अहवाल आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्यात आला. त्यानंतर महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने रुग्णलाय दोषी असल्याचे त्यांनी सांगितले होते. दीनानाथ मंगेशकर, सूर्या हॉस्पिटल आणि ससून रुग्णालयाचा अहवाल, माता मृत्यू अन्वेषण समिती कडून चौकशी होणार आणि त्यांचा सुद्धा अहवाल येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आज दोन्ही चौकशी अहवालावर राज्य शासन तातडीने कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली.

Related Articles