पुणे : लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी संयुक्त परीक्षेतील पदांमध्ये वाढ करावी, राज्य सेवा मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलावी यासह विविध मांगण्यांसाठी श्ाुक्रवारी आंदोलन केले. या आंदोलनाला विद्यार्थ्यांना परवानगी नाकारली होती, तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास मनाई करत काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आल्याचे समजते. यावेळी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
Fans
Followers