मायवतींच्या पुतणीचा हुंड्यासाठी छळ   

पतीसह सात जणांवर गुन्हा 

हापूर : हुंड्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याची तक्रार बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतणीने केली आहे. या प्रकरणी पतीसह सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हापूर नगरपरिषदेचे अध्यक्षा आणि अन्य सहा जणांविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मायावती यांच्या पुतणीचा विवाह हापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा देवी यांचा मुलगा विशाल सोबत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला होता, अशी माहिती त्यांचे वकील राजीव शर्मा यांनी दिली. छळाचा प्रकार उघडकीस येताच बहुजन समाज पक्षाने पुष्पा देवी आणि त्यांचे पती श्रीपाल सिंग आणि मुलगा विशाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे, असे जिल्हाध्यक्ष ए. के. करदम यांनी सांगितले. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी पक्षाची उमेदवारी आणि ५० लाख रुपये मागितले होते. 

Related Articles