कोलकात्याचा ८ फलंदाज राखून विजय   

चेन्नई : आयपीएलचा २५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याच्या संघाने ८ फलंदाज राखून विजय मिळविला. या सामन्याआधी कोलकात्याच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईच्या संघाने २० षटकांत फक्त १०३ धावा केल्या.
 
कोलकात्याच्या गोलंदाजी समोर चेन्नईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर १०४ धावांचे आव्हान मिळालेल्या कोलकात्याच्या संघाने फक्त २ फलंदाज गमावत सामना जिंकला. कोलकात्याच्या संघाने १०.१ षटकांत १०७ धावा केल्या. डीकॉक याने १६ चेंडूत २३ धावा केल्या. अंशूल कंबोज याने डीकॉक याचा त्रिफळा उडविला.सुनिल नार्णे याने ४४ धावा केल्या. नूर अहमद याने त्याला त्रिफळाबाद केले. अजिंक्य रहाणे २० धावांवर नाबाद राहिला. रिंकू सिंग याने नाबाद १५ धावा केल्या. ५ अवांतर धावा कोलकात्याच्या संघाला मिळाल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांपैकी हार्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. सुनिल नार्णे याने ३ बळी टिपले. तर मोइन अली आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. 
 
त्याआधी चेन्नई संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर रचीन रवींद्र ४ धावांवर बाद झाला. कॉन्वे १२ धावांवर तंबूत माघारी परतला. कॉन्वे याला मोइन अली याने पायचित बाद केले. त्रिपाठी १६ धावांवर असताना नार्णे याने त्याचा त्रिफळा उडविला. विजय शंकर याने २९ धावा केल्या. वरुण चक्रवर्ती याने शानदार गोलंदाजी करत मोइन अली याच्याकडे त्याला झेलबाद केले. शिवम दुबे ३१ धावांवर नाबाद राहिला. अश्विन याने १ धाव काढली. अश्विन याला हर्षीत राणा याने चकविणारा चेंडू टाकत वैभव अरोराकडे झेलबाद केले. रवींद्र जडेजा आणि दीपक हुडा हे दोघेही शून्यावर तंबूत माघारी परतले. धोनी जोरदार फटकेबाजी करत मोठी धावसंख्या उभा करेल असे वाटत असताना नार्णे याच्या गोलंदाजीवर धोनी पायचित बाद झाला. त्यानंतर नूर अहमद आणिांकुश कंबोज झटपट बाद झाले. 
 
चेन्नई सुपर किंग्ज  :  रचिन रवींद्र ४ , डेव्हॉन कॉनवे १२, राहुल त्रिपाठी १६, विजय शंकर २९ , शिवम दुबे नाबाद ३१, धोनी १ , रवींद्र जडेजा ०, रविचंद्रन अश्विन १ , नूर अहमद १ , अंशुल कंबोज नाबाद ३, एकूण : २० षटकांत १०३/९ 
 
कोलकाता नाईट रायडर्स : क्विंटन डी कॉक २३  , सुनील नरेन ४४ , अजिंक्य रहाणे नाबाद २०, रिंकू सिंग नाबाद १५, अवांतर ५ एकूण १०.१ षटकांत १०७/२

Related Articles