व्हॉट्सऍप कट्टा   

एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता.
 
त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली.
 
ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले.
 
परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले.
 
तात्पर्य : आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल. त्यामुळेच म्हटले जाते की, रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असतो.
---------
आयुष्यात एकदम यश मिळत नसते, तर हळूहळू पुढे जात राहावे लागते आणि एक दिवस यश आपल्या जवळ येते. कोणतेही मोठे यश एका रात्रीत मिळत नाही; त्यासाठी सातत्य, मेहनत आणि संयम आवश्यक असतो. प्रत्येक लहान प्रयत्न आपल्याला यशाच्या दिशेने पुढे नेत असतो. अनेक थोर व्यक्तींनी अपयशांचा सामना केला, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि अखेरीस मोठे यश मिळवले. त्यामुळे ध्येयावर विश्वास ठेवून, सातत्याने मेहनत घेत राहणे हाच यशाचा खरा मार्ग आहे.
---------
नवरा पाण्याची बादली घेऊन जात असतो
बायको : अहो! कुठे निघालात?
नवरा : अगं! ऊन खूप वाढलं आहे.
गच्चीवर चाललोय, चिमण्यांना पाणी ठेवायला.
बायको : गपचूप खाली या! 
तुमच्या सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.
----------
एका गावामध्ये खूप पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.
 
त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडयात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे.
 
पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते. 
 
तात्पर्य : कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.
---------
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, ही संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
---------
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
---------
मन्या : माझ्या घरात सगळ्या वस्तु आहेत, कशाचीच कमी नाय
गण्या : तू एकदा ‘डी मार्ट’ला जा, मग कळेल तुझ्या घरात काय-काय नाय!
---------
बँक अकाऊंट झाले, पॅन कार्ड झाले, सिम कार्ड झाले, ड्रायव्हिंग लायसन्स झाले... 
आता फक्त लोकांची ‘लफडीच’ काय ती राहिलीयेत आधारला जोडायची....
---------
बायको : जास्त पिऊ नका.
नवरा : तुला कसं कळालं की मी प्यायला आलोय.
बायको : किचनमधून ५ ग्लास चोरीला गेले आहेत म्हणून...
----------

Related Articles