उजनी धरणातून सोडलेले पाणी येत्या आठ दिवसांत औज बंधाऱ्यात पोहोचेल   

सोलापूर :- उजनी धरणातून पाणी सोलापूर शहराला पुरवठा करण्यासाठी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. उजनी ते औज बंधारा दरम्यानचे अंतर २३२ किलोमीटर असून, पुढील ८ दिवसांत हे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचेल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. उजनीतून ६ हजार क्युसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. सध्या भीमा नदीपात्रात पाणी असल्याने जलदगतीने प्रवास सुरू आहे. ८ एप्रिल रोजी सोडलेले पाणी एकूण १० दिवसात औज बंधाऱ्यात पाणी पोहचू शकणार आहे. 

Related Articles