विजेचा धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू   

लोखंडी जिन्यामध्ये उतरला विजेचा प्रवाह

सोलापूर :- लोखंडी जिन्यात विजेचा प्रवाह उतरल्याने नववीमध्ये शिकणारी राजनंदिनी अणय राजनंदिनी कांबळे कांबळे (वय १५) जागीच मृत्यूमुखी पडली. ही दुर्घटना जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापूरे चाळ येथे घडली. अचानक वादळी वाऱ्यासह पूर्व मौसमी पाऊस पडत असल्याने घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत जाण्यासाठी लोखंडीत जिनामध्ये राजनंदिनी चढली. त्याच दरम्यान खांबावरून घरामध्ये घेतलेल्या विजेची वायर तुटून लोखंडी जिनामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने राजनंदिनी त्याच ठिकाणी चिटकून बेशुद्ध पडली. आजी जनाबाई बाहेर आल्या, त्यांना बेशुद्ध पडलेली राजनंदिनी दिसताच त्यांनी लाकड्याच्या साह्याने तिला बाजूला ढकलले. आरडा-ओरड करताच परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी राजनंदिनीला खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारपूर्वीच तिचा मृत्यू झाला.राजनंदिनी, आई व दोन भावंडांसमवेत कोनापुरे चाळ येथे आजी, मामाच्या घरी राहते. आई, मजुरी करत असून वडील पुण्यामध्ये असतात. ह. दे. प्रशालेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती.माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे व इतरांनी वीज वितरण कंपनीस कळवून विद्युत पुरवठा बंद केला. वीज वितरण कंपनीबाबत परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू होती. 

Related Articles